Monday, September 01, 2025 08:52:07 AM

Alwar News: गेल्या 20 वर्षांपासून सरकारी शिक्षिकेला खेचत राहिली अदृश्य शक्ती; पत्र वाचताच पोलीस हैराण

35 वर्षांची गुड्डी नावाची सरकारी शिक्षिका नेहमी शांत राहत होती. ती पतीला आणि कुटुंबीयांना काहीच सांगत नव्हती. अचानक तिने स्वतःला खोलीत बंद करून ठेवली.

alwar news गेल्या 20 वर्षांपासून सरकारी शिक्षिकेला खेचत राहिली अदृश्य शक्ती पत्र वाचताच पोलीस हैराण

राजस्थानमधील अलवर या शहरातून आश्चर्य करणारी बातमी समोर आली आहे. 35 वर्षांची गुड्डी नावाची सरकारी शिक्षिका नेहमी शांत राहत होती. ती पतीला आणि कुटुंबीयांना काहीच सांगत नव्हती. अचानक तिने स्वतःला खोलीत बंद करून ठेवली. पती बाहेरून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत राहिला, पण, जेव्हा दरवाजा उघडला, तोपर्यंत त्या शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला होता. कुटुंबीयांना तिचे शेवटचे पत्र मिळाले, ज्यामध्ये तिने लिहिले होते, 'त्याची तांत्रिक शक्ती मला आकर्षित करत राहिली'. नेमकं काय आहे ही बातमी जाणून घेऊया सविस्तर. 


शिक्षिकेने प्राणघातक पाऊल उचलले:

महाराजा सूरजमल कॉलनी, मुगास्का, अलवरमधील अरवली विहार पोलीस स्टेशन परिसरात एका महिला सरकारी शिक्षिकेने प्राणघातक पाऊल उचलले. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह घटनास्थळावरून उचलून जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. सहाय्यक उपनिरीक्षक शंकर लाल यांनी सांगितले की, 'महाराजा सूरजमल कॉलनीत भाड्याने राहणाऱ्या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस ठाण्यात मिळाली. महिला शिक्षिका गुड्डी देवी या मुगास्का येथील कुलवंत सिंग यांच्या घरात भाड्याने राहत होत्या आणि त्या सुमारे दीड वर्षांपासून तेथे राहत होत्या. बख्तलच्या चौकीजवळील असलेल्या पाथरौडा सरकारी शाळेत त्या सरकारी शिक्षिका होत्या.


आपल्या मृत्यूसाठी तांत्रिक जबाबदार:

मृत महिलेचा पती गुड्डी देवी हाही अभानेरी शासकीय शाळेत शिक्षक आहे. गुड्डी देवी या महिलेने शाळेतून घरी आल्यानंतर, खोलीला कुलूप लावून आत्महत्या केली. तपासादरम्यान, महिलेचे शेवटचे पत्र सापडले असून त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चिठ्ठीत महिलेने मृत्यूसाठी तांत्रिक देवी सहाय कुम्हार रहिवासी बागड राजपूत यांना जबाबदार धरले आहे. या पत्रामध्ये मृत महिलेने लिहिले आहे की, 'आपल्यावर तंत्र विद्या करून त्याने पैसे काढण्याची गोष्ट लिहिली होती'. पुढे महिलेने लिहिले, 'अकरावीत असताना ती कोणासोबत तांत्रिकाकडे गेली होती. तेव्हापासून तांत्रिकाने तिच्यावर तंत्रविद्या केली. तेव्हापासून तो तांत्रिक तिचा छळ करत होता'.


सम्बन्धित सामग्री