Sunday, August 31, 2025 09:30:25 AM

Karnataka Shocker: विवाहबाह्य संबंधाने घेतला जीव! प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काडी घालून प्रियकराने केली महिलेची अमानुष हत्या

एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला.

karnataka shocker विवाहबाह्य संबंधाने घेतला जीव प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काडी घालून प्रियकराने केली महिलेची अमानुष हत्या

Karnataka Shocker: कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील सालिग्रामा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला. ही घटना सालिग्रामा तालुक्यातील भेरिया गावात घडली. 

हुनासुर तालुक्यातील गेरासनहल्ली गावातील सिद्धराजू नावाच्या व्यक्तीने पिरियापट्टणातील बिलीकेरे गावात राहणारी 20 वर्षीय रक्षिता हिचा खून केला. वृत्तानुसार, रक्षिता ही केरळमधील एका पुरुषाशी विवाहबद्ध होती. तथापि, तिचे सिद्धराजूसोबत विवाहबाह्य संबंध होते. गुन्ह्याच्या दिवशी आरोपीने रक्षिता हिला शेतात बोलावून एका लॉजमध्ये नेले. तिथेच त्याने या भीषण गुन्ह्याची योजना आखली. आरोपीने जिलेटिनची काडी तिच्या तोंडात ठेवून स्फोट घडवून तिचा निर्घृण खून केला.

हेही वाचा - WhatsApp Wedding Card Scam: 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज, क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये

घटनास्थळी उपस्थित असताना सिद्धराजूने लगेचच हॉटेल कर्मचाऱ्यांना मोबाईल फोनचा स्फोट झाला असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला कारण घटनास्थळी मोबाईलचा कोणताही अवशेष आढळला नाही. जेव्हा त्यांनी आणखी चौकशी केली असता आरोपीने सांगितले की, स्फोटानंतर त्याने मोबाईल खिडकीतून बाहेर फेकला. कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला पण मोबाईल सापडला नाही.

हेही वाचा - Delhi Crime : बायकोला जिवंत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपी विपिन भाटीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सासू अटकेत

त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संशय वाढला आणि लॉज कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवून ठेवून याबाबत पोलिसांना माहिती दिली. चौकशीदरम्यान सिद्धराजूने अखेर सत्य कबूल केले की त्याने प्रेयसीचा खून केला आहे. सध्या सालिग्रामा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळाची पाहणी करून जिलेटिन स्फोटकाचा तपास करत आहेत. या अमानुष खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


सम्बन्धित सामग्री