Amit Shah On Naxalism: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आयोजित 'बस्तर पंडुम' कार्यक्रमात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना विशेष आवाहन केले आहे. अमित शाह म्हणाले, 'मी नक्षलवाद्यांना शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. जेव्हा ते मारले जातात तेव्हा कोणीही आनंदी नसते,' असेही अमित शहा यांनी यावेळी नमूद केले.
बस्तर नक्षलमुक्त होत आहे -
यावेळी अमित शहा म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात बस्तर नक्षलमुक्त होत आहे. विकासाचा सुवर्णकाळ येथे सुरू आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बस्तरच्या आदिवासींचा विकास नक्षलवादी थांबवू शकत नाहीत. त्यांना विकास प्रवासाचा एक भाग बनवावे लागेल.
हेही वाचा - राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून झटका! वीर सावरकर मानहानी खटल्यातील समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
'जिल्हा बांधकाम समिती'ची स्थापना करण्यात मान्यता -
तथापि, छत्तीसगड सरकारने नक्षलग्रस्त सुकमा, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांमधील बांधकाम कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी 'जिल्हा बांधकाम समिती' स्थापन करण्यास अलीकडेच मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सांगितले की, कोणत्याही स्तरावर भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. नक्षलग्रस्त भागात जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल.
हेही वाचा - Waqf Amendment Bill 2025 : वक्फ विधेयक राज्यसभेतही मंजूर; राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर होणार कायद्यात रूपांतर
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा बांधकाम समितीच्या स्थापनेबाबत आदेश जारी केला आहे. बांधकाम कामांची चांगली अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यांकन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जिल्हा दंडाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असतील.