Sunday, August 31, 2025 07:57:13 AM

दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात; 1 ऑगस्टपासून लागू होणार नवीन किमती

1 ऑगस्ट 2025 पासून ही नवीन किंमत लागू होणार आहे. ही कपात लागू झाल्यानंतर, दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत आता 1,631.50 रुपये असेल.

दिलासादायक lpg गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात 1 ऑगस्टपासून लागू होणार नवीन किमती
LPG gas cylinder Price Update
Edited Image

नवी दिल्ली: देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 33.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून ही नवीन किंमत लागू होणार आहे. ही कपात लागू झाल्यानंतर, दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत आता 1,631.50 रुपये असेल. ही सवलत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि लघु व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

हेही वाचा - ऑगस्टमध्ये UPI, FASTag सह बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही - 

सध्या घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांसाठी दर स्थिरच राहणार आहेत. तेल कंपन्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि स्थानिक कर रचना लक्षात घेऊन दर महिन्याला सिलिंडरच्या किमतींचे पुनरमूल्यांकन केले जाते.

हेही वाचा - दरमहा 500 रुपये गुंतवा अन् निवृत्तीनंतरची चिंता मिटवा! काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कपात

दरम्यान, व्यावसायिक एलपीजीच्या दरात ही सलग पाचवी कपात आहे. मागील महिन्यात, म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी, 58.50 रुपयांची कपात झाली होती. त्याआधी जून 2025 मध्ये 24 रुपये, मेमध्ये 14.50 रुपये आणि एप्रिलमध्ये 41 रुपयांची कपात करण्यात आली होती. या सातत्याने होणाऱ्या कपातींमुळे लघु उद्योग, फूड इंडस्ट्री आणि हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
 


सम्बन्धित सामग्री