Sunday, August 31, 2025 02:33:27 PM

Centre Extends Exemption Period for Old Vehicle: कार मालकांना मोठा दिलासा! आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षे रस्त्यावर धावणार

आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षांसाठी नोंदणी नूतनीकरण करून चालवता येतील. म्हणजेच, एखाद्या गाडीचे आयुष्य आता 20 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे.

centre extends exemption period for old vehicle कार मालकांना मोठा दिलासा आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षे रस्त्यावर धावणार

Centre Extends Exemption Period for Old Vehicle: केंद्र सरकारने वाहन मालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षांसाठी नोंदणी नूतनीकरण करून चालवता येतील. म्हणजेच, एखाद्या गाडीचे आयुष्य आता 20 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. मात्र, यासाठी मालकांना वाढीव शुल्क भरावे लागेल. हा नियम फक्त दिल्ली-एनसीआरमध्येच नाही, तर संपूर्ण देशभर लागू झाला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम, 2025 अंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. सरकारचे उद्दिष्ट जुनी, प्रदूषण करणारी वाहने हळूहळू रस्त्यावरून हटवणे आणि नागरिकांना नवीन वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे.

हेही वाचा - Pregnant Woman Suffers : 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेची बांगलादेशी म्हणून रवानगी; नंतर भारतीय घुसखोर म्हणून बांगलादेशात अटक

20 वर्षे जुनी वाहन नोंदणी नूतनीकरणासाठी नवीन शुल्क - 

अवैध वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क – 100
मोटारसायकल – 2,000
तीनचाकी / क्वाड्रिसायकल – 5,000
हलकी मोटार वाहने (कार इ.) – 10,000
आयात केलेली दुचाकी – 20,000
आयात केलेली चारचाकी – 80,000
इतर श्रेणीतील वाहने – 12,000

हेही वाचा - Online Gaming Bill 2025: 'अ‍ॅपमधील सर्व पैसे काढून घ्या', ड्रीम-11 ॲपचं ग्राहकांना आवाहन

कोणाला होणार फायदा?

ज्यांच्याकडे 15 वर्षांपेक्षा जुनी कार, बाईक किंवा इतर वाहनं आहेत, त्यांना आता जुन्या वाहनांचा वापर आणखी 5 वर्षांसाठी करता येणार आहे. मात्र, वाढीव शुल्क भरावे लागेल. त्यामुळे जुन्या गाड्यांचे मालक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरी त्याचबरोबर जास्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल. हा निर्णय एकीकडे वाहन मालकांसाठी सोयीचा असला तरी, सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाशीही सुसंगत आहे. कारण, वाढलेल्या शुल्कामुळे अनेक लोक नवीन आणि कमी प्रदूषण करणारी वाहने घेण्यास प्राधान्य देतील.


सम्बन्धित सामग्री