सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहाबादियाला त्याचा पॉडकास्ट ‘द रणवीर शो’ पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याला एक अट घालण्यात आली आहे – त्याच्या शोमध्ये नैतिकतेचे योग्य स्तर राखले जातील याची हमी द्यावी लागेल.सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतिकतेमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. सरकारने डिजिटल माध्यमांसाठी नियमावली तयार करताना याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही कोर्टाने दिले.
विवाद कशामुळे पेटला?
रणवीर अल्लाहाबादियाने एका शोमध्ये अतिशय आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता – 'तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना संबंध ठेवताना पाहाल, की एकदाच सहभागी होऊन ते थांबवाल?' या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला आणि त्याच्यावर अनेक पोलिस तक्रारी दाखल झाल्या. यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. रणवीरने तात्काळ ‘X’ (ट्विटर) वर माफी मागितली आणि स्पष्ट केले की, “हे माझ्या बाजूने चुकीचे होते. कॉमेडी हा माझा कधीच मजबूत विषय नव्हता. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे.”
हेही वाचा : युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा – राज्यपालांकडे मागणी
भारत सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, रणवीरचे वक्तव्य "अश्लील नसून विकृत" होते.न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी नमूद केले की, “गंभीर भाषा वापरणे म्हणजे प्रतिभा नाही. एक 75 वर्षांचे कलाकार आहेत जे विनोद सादर करतात, त्यांचा शो संपूर्ण कुटुंब पाहू शकतो. हेच खरे टॅलेंट असते.”
न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना दिल्या की, डिजिटल माध्यमांसाठी कोणत्याही कठोर सेन्सॉरशिपशिवाय नियम आखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व संबंधित पक्षांचा सहभाग आवश्यक आहे.
हेही वाचा : India’s Got Latent प्रकरणात राखी सावंतची चौकशी होणार; महाराष्ट्र सायबर सेलकडून बजावण्यात आले समन्स
रणवीर अल्लाहाबादियाचा शो सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र भविष्यात तो आपल्या कंटेंटमध्ये अधिक जबाबदारीने वागेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!