Wednesday, August 20, 2025 09:17:33 PM

26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय

2008  मध्ये संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला आरोपी तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

2611  चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय

 2008  मध्ये संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला आरोपी तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली असून, यामुळे भारत सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राणा हा पाकिस्तानातून आलेला आणि कॅनडामध्ये नागरिकत्व घेतलेला उद्योगपती असून, तो सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये आहे.

राणाने यापूर्वी आपल्या प्रत्यार्पणावर स्थगिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या नवींवा सर्किट कोर्टात अर्ज दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 4 एप्रिल रोजी या अर्जावर बैठक झाली आणि अखेर न्यायालयाने सोमवारी निर्णय देताना त्याचा अर्ज नाकारल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

भारत सरकारने राणाच्या प्रत्यार्पणासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले. 2018 मध्येच त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही राणाच्या प्रत्यार्पणास समर्थन दिले होते. त्यामुळे भारत सरकारला अमेरिकेच्या प्रशासनाकडूनही यासाठी पाठिंबा मिळाला होता.

आता या निर्णयानंतर तहव्वूर राणाला भारतात आणून 26/11 च्या भीषण हल्ल्यातील त्याच्या भूमिकेचा पर्दाफाश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या प्रत्यार्पणामुळे केवळ न्यायप्रक्रियेचा वेगच वाढणार नाही, तर 26/11 च्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या नातवाइकांसाठीही एक प्रकारचा न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष या पुढील कारवाईकडे लागले आहे.


सम्बन्धित सामग्री