Monday, September 01, 2025 09:18:00 AM

गोंडामध्ये बोलेरो कार कालव्यात पडली; एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

इटिया ठोक पोलिस स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण 15 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला.

गोंडामध्ये बोलेरो कार कालव्यात पडली एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
Gonda Accident
Edited Image

Gonda Accident: रविवारी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील इटियाठोक परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक पृथ्वीनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. इटिया ठोक पोलिस स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण 15 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांना 4 जणांना बचावण्यात यश आले आहे.

हेही वाचा - नितीन गडकरी यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकी; काही तासांतच आरोपीला अटक

सर्व भाविक मोतीगंज परिसरातून मंदिर दर्शनासाठी निघाले होते. वाटेत कारने इटियाठोक पोलिस स्टेशन परिसरात प्रवेश करताच बोलेरो अचानक कालव्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी (DM) आणि पोलीस अधीक्षक (SP) तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. कालव्यातून चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून, जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - देशात सापडलेले 'रेअर अर्थ मिनरल्स' गेमचेंजर ठरणार.. भारताची कोंडी करू पाहणाऱ्या चीनची मस्ती जिरणार!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्याचे आणि योग्य उपचार देण्याचे निर्देश मी दिले आहेत. मी भगवान श्री राम यांना मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे प्रचंड दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकर बरे होण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. ओम शांती!'
 


सम्बन्धित सामग्री