Sunday, August 31, 2025 05:44:28 PM

बेंगळुरू विमानतळावरील प्रसिद्ध कॅफेच्या पोंगलमध्ये सापडले झुरळ, पहा व्हिडिओ

ही घटना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये घडली. ग्राहक लोकनाथने गुरुवारी सकाळी रामेश्वरम कॅफेमधून 300 रुपयांचा पोंगल खरेदी केले होते.

बेंगळुरू विमानतळावरील प्रसिद्ध कॅफेच्या पोंगलमध्ये सापडले झुरळ पहा व्हिडिओ
Cockroach in Pongal
Edited Image

कर्नाटक: बेंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या एका शाखेत एका ग्राहकाच्या जेवणात झुरळ आढळल्याने गोंधळ उडाला. ग्राहकाने पोंगल खरेदी केले होते, ज्यामध्ये झुरळ सापडले. ही घटना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये घडली. ग्राहक लोकनाथने गुरुवारी सकाळी रामेश्वरम कॅफेमधून 300 रुपयांचा पोंगल खरेदी केले होते. मात्र, पोंगल खात असताना त्याला त्यात झुरळ दिसले.

हेही वाचा - बाप रे!! एक नाही, दोन नाही…थेट 19 साप दिसले एकत्र; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्

कॅफे कर्मचाऱ्यांनी मान्य केली चूक - 

दरम्यान, लोकनाथने ताबडतोब रेस्टॉरंट व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार केली. कॅफे कर्मचाऱ्यांनी त्यांची चूक मान्य केली आणि माफी मागितली. परंतु या घटनेमुळे ग्राहकांमध्ये शुद्धता आणि स्वच्छतेबाबत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की, एवढी मोठी किंमत मोजूनही असा निष्काळजीपणा सहन केला जाऊ शकत नाही.

हेही वाचा - विरारमध्ये डिलिव्हरी बॉयचे घाणेरडे कृत्य; लिफ्टमध्ये केली लघूशंका

रेस्टॉरंट्सविरोधात कारवाईची मागणी  - 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, बेंगळुरूमधील अन्य कॅफे आणि रेस्टॉरंट्समधून देखील अशा तक्रारी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अन्न सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर खाद्यपदार्थांमध्ये अशा स्वरुपाच्या तक्रारी समोर आल्या आहेत.   


सम्बन्धित सामग्री