Dual Citizenship: जगातील अनेक देशांनी परदेशी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी 'सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट' (CBI) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, विशिष्ट रक्कम गुंतवणूक केल्यानंतर त्या देशाचं नागरिकत्व मिळवता येतं. विशेषतः भारतातील उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये या योजनेबाबत मोठी उत्सुकता आहे. भारत सरकार दुहेरी नागरिकत्व मान्य करत नसल्यामुळे अशा नागरिकांनी भारतीय पासपोर्टचा त्याग करावा लागतो.
चला तर पाहूया, कोणते आहेत ते 9 देश जिथे भारतीय नागरिक नागरिकत्वासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज न पडता नागरिक बनू शकतात:
1. डोमिनिका: कारिबियन समुद्रातील या देशात किमान 76 लाख रुपयांचे योगदान दिल्यास नागरिकत्व मिळू शकतं. कोणतीही शैक्षणिक पात्रता अथवा भाषेची अट नाही. 3 ते 6 महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होते आणि 145 देशांत व्हिसा-मुक्त प्रवासाची सुविधा मिळते.
2. सेंट लुसिया: इथेही 76 लाख रुपयांची गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येते. 4 ते 5 महिन्यांच्या प्रक्रियेनंतर व्हिसा मिळतो. कोणताही आंतरराष्ट्रीय कर भरण्याची गरज नाही.
3. वानुआटू: प्रशांत महासागरातील या देशात 80 लाख रुपये गुंतवल्यास केवळ 60 दिवसांत नागरिकत्व मिळतं.
4. ग्रेनाडा: इथे नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान 95 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. ग्रेनाडाच्या विशेषतेत अमेरिकेच्या E-2 व्हिसा करारात प्रवेश असलेला देश म्हणून ओळख आहे, त्यामुळे अमेरिकेत राहता आणि काम करता येतं.
5. अँटिग्वा आणि बारबुडा: इथेही 76 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून नागरिकत्व मिळू शकतं.
6 . तुर्की: तुर्कीमध्ये नागरिकत्वासाठी किमान 1 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची गुंतवणूक आवश्यक आहे. नागरिकत्व मिळाल्यानंतर युरोपियन युनियन देशांमध्ये सहज प्रवास करता येतो.
7. उत्तर मॅसेडोनिया: युरोपातील या देशात 92 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर नागरिकत्व मिळतं. बाल्कन प्रदेशाचा प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे हे देश युरोपमध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून देतो.
8. मोल्दोव्हा: इथेही नागरिकत्वासाठी 92 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे. 120 पेक्षा जास्त देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवासाची सुविधा मिळते.
9. सेंट किट्स आणि नेव्हिस: जगातील सर्वात जुनी CBI योजना असलेल्या या देशात 92 लाख रुपये गुंतवल्यास नागरिकत्व दिलं जातं.
भारतीय नागरिकांसाठी हे देश आकर्षण ठरत आहेत, कारण फक्त पैसे गुंतवून जागतिक स्तरावर ओळख मिळवता येते. मात्र, यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो. त्यामुळे निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.