CRPF personnel's vehicle falls into gorge
Accident in Udhampur: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील बसंतगड भागात सीआरपीएफचे वाहन 200 फूट खोल दरीत पडल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातात जखमी झालेल्यांना वाचवण्यात आले असून उपचारासाठी बसंतगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?
प्राप्त माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास कडवा परिसरात ही घटना घडली. त्यावेळी बसंतगडहून एका ऑपरेशनवरून सैनिक परतत होते. निमलष्करी दलाची 187 वी बटालियन गाडीत होती. उधमपूरचे अतिरिक्त एसपी संदीप भट यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: मंत्री अतुल सावे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी सरसावले
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला शोक -
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, उधमपूरजवळ झालेल्या अपघातात CRPF जवानांच्या मृत्युमुळे मला दुःख झाले आहे. राष्ट्रासाठी त्यांनी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोत्तम शक्य ती काळजी आणि मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.'