Monday, September 01, 2025 10:41:56 AM

जेलची हवा खाणाऱ्या दिल्लीतील 'त्या' उमेदवारांची काय आहे स्थिती? जनतेने नाकारलं की, स्विकारलं? जाणून घ्या

दिल्ली सरकारमधील तीन मोठे नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन यांची नावे आहेत.

जेलची हवा खाणाऱ्या दिल्लीतील त्या उमेदवारांची काय आहे स्थिती जनतेने नाकारलं की स्विकारलं जाणून घ्या
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन
Edited Image

Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाची आघाडी कायम आहे. यावेळी आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसताना दिसत आहे. दिल्ली सरकारमधील तीन मोठे नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन यांची नावे आहेत. या तीन मोठ्या नेत्यांवर आणि माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. आम आदमी पक्षाच्या सरकारमधील या तीन मोठ्या नेत्यांना तुरुंगातही जावे लागले होते. तुरुंगवास भोगलेल्या या तीन नेत्यांवर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांना पूर्णपणे नाकारले? हे जाणून घेऊयात. 

केजरीवाल पिछाडीवर - 

निवडणूक आयोगाच्या सकाळी 10:55 वाजताच्या आकडेवारीनुसार, मतमोजणीच्या सहाव्या फेरीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 225 मतांनी मागे आहेत. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी आघाडी घेतली आहे. या जागेवर मतमोजणीच्या एकूण 13 फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरच या जागेचा अंतिम निकाल येईल.

हेही वाचा - दिल्लीत सत्ता कोणाची? अखेर कोण राखणार राजधानीचे तख्त? आज समजणार दिल्लीकरांचा कौल

मनीष सिसोदिया जंगपुरा येथून 600 मतांनी पराभूत - 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते मनीष सिसोदिया जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करला आहे. भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी त्यांचा 600 मतांनी पराभव केला. सिसोदिया यांनी आपला पराभव स्वीकारला आणि भाजप उमेदवाराचे विजयाबद्दल अभिनंदन केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2020 मध्ये सिसोदिया यांनी पटपरगंजमधून निवडणूक लढवली होती. पण यावेळी जागा बदलूनही ते जिंकू शकले नाही.

हेही वाचा -Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?

सत्येंद्र कुमार जैन पिछाडीवर - 

माजी मंत्री सत्येंद्र कुमार जैन दिल्लीतील शकूर बस्ती येथून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र कुमार जैन मतमोजणीच्या पाचव्या फेरीत पिछाडीवर आहेत. भाजप उमेदवार कर्णैल सिंह 8749 मतांनी आघाडीवर आहेत. येथे मतमोजणीच्या एकूण 11 फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरच या जागेचा अंतिम निकाल येईल. शकूर बस्ती विधानसभा जागेवरील लढत खूपच रंजक दिसत आहे. त्याचवेळी, भाजप उमेदवार कर्नैल सिंह यांनी सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. मतमोजणीच्या ट्रेंडमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर आहे.


सम्बन्धित सामग्री