Wednesday, September 03, 2025 06:30:42 PM

एअर इंडियाच्या विमानात घृणास्पद कृत्य! मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर केली लघवी

या घटनेबद्दल विचारले असता, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू म्हणाले की, मंत्रालय या घटनेची दखल घेईल आणि विमान कंपनीशी चर्चा करेल.

एअर इंडियाच्या विमानात घृणास्पद कृत्य मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर केली लघवी
Drunk passenger urinates on another passenger
Edited Image

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा प्रवाशावर लघवी केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर लघवी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एअर इंडियाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेबद्दल विचारले असता, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू म्हणाले की, मंत्रालय या घटनेची दखल घेईल आणि विमान कंपनीशी चर्चा करेल. जर काही चूक झाली असेल तर आम्ही आवश्यक ती कारवाई करू, असं आश्वासनही नायडू यांनी दिलं आहे.

हेही वाचा - 2025 मध्ये 3 मोठ्या एअरलाइन्स सुरू होणार! एअर इंडिया आणि इंडिगोशी होणार स्पर्धा

यापूर्वीही घडली विमानात लघवीची घटना -  

3 वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. ही घटना 26 नोव्हेंबर 2022 ची आहे. एअर इंडियाचे विमान (AI-102) न्यू यॉर्कहून दिल्लीला येत होते. बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या शंकर मिश्राने दारू पिऊन एका वृद्ध महिला प्रवाशावर लघवी केली. घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर महिलेने एअर इंडिया आणि डीजीसीएकडे तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण प्रकाशझोतात आले.

हेही वाचा - विमानातून सगळे उतरले, पण एक जण उतरलाच नाही; झोपलेल्या व्यक्तीचा सीटबेल्ट काढताच सर्वांना बसला धक्का

विमान कंपनीला ठोठावण्यात आला दंड - 

त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये शंकर मिश्रा यांना अटक करण्यात आली. एवढेच नाही तर या प्रकरणात एअर इंडियावरही बदनामी झाली. एअर इंडियावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. यावर कारवाई करत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपनीला दंडही ठोठावला होता.
 


सम्बन्धित सामग्री