Wednesday, September 03, 2025 08:01:27 PM

Share Market: चीन-भारत मैत्रीचा शेअर बाजारावर परिणाम; धातूंच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ

आज सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 हिरव्या रंगात बंद झाले, तर फक्त 8 समभाग घसरणीत होते. टाटा स्टीलने सर्वाधिक उसळी घेतली असून त्याचे शेअर्स तब्बल 5.90 टक्क्यांनी वाढले.

share market चीन-भारत मैत्रीचा शेअर बाजारावर परिणाम धातूंच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ

Share Market: बुधवारी भारतीय शेअर बाजाराने उत्साहवर्धक कामगिरी केली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 0.51 टक्के म्हणजेच 409 अंकांनी वाढून 80,567 वर बंद झाला. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.55 टक्के किंवा 135 अंकांच्या वाढीसह 24,715 या पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समधील घडामोडी

आज सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 हिरव्या रंगात बंद झाले, तर फक्त 8 समभाग घसरणीत होते. टाटा स्टीलने सर्वाधिक उसळी घेतली असून त्याचे शेअर्स तब्बल 5.90 टक्क्यांनी वाढले. त्याशिवाय टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, टाटा मोटर्स, ट्रेंट, एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक बँक, सन फार्मा, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, बीईएल, मारुती, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. 

हेही वाचा - GST Council Meeting 2025: जीएसटी कौन्सिलची बैठक आजपासून सुरू; कर स्लॅब कपातीबाबत मोठा निर्णय होणार

दुसरीकडे, इन्फोसिस, एनटीपीसी, एचयूएल, टीसीएस, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि अ‍ॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तथापी, क्षेत्रीय पातळीवरही बाजारात सकारात्मक वातावरण होते. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये सर्वाधिक 3.11 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय निफ्टी पीएसयू बँक (1.03%), निफ्टी फार्मा (1.10%), निफ्टी हेल्थकेअर (1.08%), निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स (0.81%), निफ्टी रिअॅलिटी (0.39%), निफ्टी प्रायव्हेट बँक (0.74%), निफ्टी एफएमसीजी (0.29%), निफ्टी ऑटो (0.74%) आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 25/50 (0.50%) मध्येही वाढ नोंदवली गेली.

हेही वाचा - ITR Filing : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ, नाही भरलात तर होईल मोठे नुकसान

तथापि, निफ्टी आयटी (0.74%), निफ्टी मीडिया (0.04%) आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी अँड टेलिकॉम (0.38%) मध्ये थोडीशी घसरण झाली. आजच्या व्यापारातून स्पष्ट होते की गुंतवणूकदारांचा कल धातू, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रांकडे होता. चीनशी असलेल्या व्यापारी संबंधांच्या सकारात्मक संकेतांमुळे मेटल स्टॉक्समध्ये चांगली उसळी दिसून आली. एकूणच बाजाराने मजबूत समाप्ती करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे.

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!) 


सम्बन्धित सामग्री