Wednesday, September 03, 2025 10:50:22 PM

Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबरला 2025 मधलं शेवटचं चंद्रग्रहण; काय काळजी घ्याल?

खगोलशास्त्रानुसार, चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. हिंदू धर्मात चंद्रग्रहणाबद्दल अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा आहेत.

chandra grahan 2025 7 सप्टेंबरला 2025 मधलं शेवटचं चंद्रग्रहण काय काळजी घ्याल

Chandra Grahan 2025: या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे, ज्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होत असल्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते. हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या काही राशींचं नशीब उजळवणार आहे. तर काहींना अधिक काळजी घ्यावी लागेल. या ग्रहणासंदर्भात ज्योतिषशास्त्रावर आधारित माहिती खालीलप्रमाणे आहे..

धार्मिक महत्त्व आणि सूतक काळ
हे चंद्रग्रहण भारतातून पूर्णपणे दिसणार आहे. हे चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागेल. या काळात कोणतीही शुभ कार्ये, पूजा किंवा धार्मिक विधी करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे, त्याचा सूतक काळ भारतात वैध असेल. सूतक काळ ग्रहणाआधी 9 तास सुरू होतो.

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कुंभ राशीत होईल. हे ग्रहण भारतात दिसणार असून 7 सप्टेंबर रोजी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9.58 वाजता सुरू होईल आणि पहाटे 1.26 वाजता संपेल. ग्रहण काळात गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. तसेच, ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार, ग्रहण काळात मंत्रांचा जप करणे आणि दान करणे शुभ मानले जाते.

हेही वाचा - Ganeshotsav 2025: गणपती विसर्जनाआधी उंदीर दिसला, हा आहे मोठा संकेत, जाणून घ्या...

गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे. ग्रहणकाळात कोणतेही महत्त्वाचे काम करू नये, शांतता राखावी, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास टाळावा. तसेच नदी, स्मशानभूमी अशा ठिकाणी जाणे टाळावे आणि ग्रहणाच्या वेळी शिजवलेले अन्न खाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

राशींवर होणारा परिणाम
या ग्रहणाचा सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होऊ शकतो. काही राशींसाठी हा काळ लाभदायक असू शकतो, तर काहींसाठी तो आव्हानात्मक ठरू शकतो.

या राशींना ग्रहणाचा धोका
कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना या ग्रहणाचा अनिष्ट परिणाम भोगावा लागू शकतो. या राशीच्या व्यक्तींनी ग्रहण पाहू नये.
ग्रहणाच्या काळात या राशींचं नशीब खुलणार

मेष राशी – अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना फायदा, आरोग्यात सुधारणा.
मिथुन राशी – अडकलेले पैसे मिळतील, बँक बॅलन्स वाढेल, गुंतवणुकीवर परतावा.
कन्या राशी – महत्त्वाच्या प्रकरणात यश, सुखसोयींमध्ये वाढ, विरोधकांवर मात.
वृश्चिक राशी – धन-समृद्धी, घर-वाहन खरेदीची संधी, अडथळे दूर होतील.
धनु राशी – नोकरीत प्रगती, मान-सन्मान आणि पैसा, भावंडांशी नातं चांगलं होईल.
ग्रहण काळात योग्य काळजी घेतल्यास तुम्ही सुरक्षित राहाल आणि या काळाचा लाभ देखील घेऊ शकता.

खगोलशास्त्रानुसार, चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. या वैज्ञानिक कारणांव्यतिरिक्त, हिंदू धर्मात चंद्रग्रहणाबद्दल अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा आहेत.

हेही वाचा - Importance Of Donation: मंदिरात 'या' 6 गोष्टी दान करा, संकटं टळतील आणि सुख-समृद्धी लाभेल

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री