बेटिंग अॅपप्रकरणी गुगल, मेटाला ईडीने समन्स बजावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना 21 जुलैला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने गुगल आणि मेटा यांना नोटीस बजावल्या आहेत, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना 21 जुलै रोजी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
गुगल आणि मेटा या दोन कंपन्यांवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे. गुगल आणि मेटा यांनी या बेटिंग अॅप्सना जाहिरातीसाठी प्राधान्य स्थान उपलब्ध करून दिलं. यामुळे या अॅप्सचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांना आकर्षित केलं असे ईडीने म्हटले आहे. या जाहिराती फेसबुक, युट्यूब आणि सर्च इंजिनवरून दाखवल्या गेल्याचं ईडीने निदर्शनास आणलं आहे.