Sunday, August 31, 2025 01:37:29 PM

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई

टाटा ग्रुपच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, या अपघातात जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्या 33 जणांनाही भरपाई दिली जाईल, ज्यामध्ये 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मोठी बातमी अहमदाबाद विमान अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई
Ahmedabad Plane Crash
Edited Image

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. टाटा ग्रुपच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, या अपघातात जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्या 33 जणांनाही भरपाई दिली जाईल, ज्यामध्ये 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शनिवारपर्यंत अहमदाबाद विमान अपघातात 274 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये विमानातील लोक आणि अपघाताच्या वेळी अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा -  Vijay Rupani: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा मृतदेह शोधण्यात अडचणी

33 जणांना देण्यात येणार भरपाई - 

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, टाटा ग्रुप या अपघातात कुटुंबातील सदस्य गमावलेल्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देईल. परंतु त्यांनी हे स्पष्ट केले नाही की नुकसानभरपाई फक्त विमानातील लोकांनाच दिली जाईल की अपघातात जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्या लोकांनाच दिली जाईल. हे स्पष्ट करताना टाटा समूहाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या विमान अपघातात जखमी झालेल्या सर्वांना भरपाई दिली जाईल, मग ते जमिनीवर असोत किंवा विमानातील असोत.

हेही वाचा - ड्रीमलायनर विमानात किती आपत्कालीन एक्झिट असतात? एकमेव प्रवाशाचे कसे वाचले प्राण?

दरम्यान, टाटा समूहा कडून मिळालेल्या एक कोटी रुपयांव्यतिरिक्त, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना विमान विमा कंपन्यांकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. अद्याप अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समजलेले नाही. मात्र, शुक्रवारी या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे लवकरचं हा विमान अपघात नेमका का घडला, याचे कारण समजणार आहे. 


सम्बन्धित सामग्री