श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ला आणि गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याबाबत FATF ने धक्कादायक खुलासा केला आहे. FATF च्या अहवालात दहशतवादी आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आणि डिजिटल मनी ट्रान्सफरचा वापर कसा करत आहेत, याबाबत माहिती देण्यात आली आहे. FATF च्या अहवालानुसार, पुलवामा हल्ल्यासाठी, दहशतवाद्यांनी Amazon कडून स्फोटकांसाठी EPOM खरेदी केले होते. त्याचा वापर स्फोट अधिक धोकादायक करण्यासाठी करण्यात आला होता.
पुलवामा दहशवादी हल्ला -
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद (JeM) ला जबाबदार धरण्यात आले होते. तथापी, FATF च्या अहवालानुसार, 2022 मध्ये गोरखनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्यासाठी आरोपींनी डिजिटल पेमेंटचाही अवलंब केला होता. FATF नुसार, हल्ल्यासाठी ऑनलाइन पेमेंट आणि VPN चा वापर करण्यात आला होता.
हेही वाचा - ''ऑपरेशन सिंदूरचं राजकारण थांबवा''; संजय राऊत यांची कठोर शब्दांत टीका
तपासात असे दिसून आले की हल्लेखोराने ISIL च्या समर्थनार्थ PayPal द्वारे परदेशात 6,69,841 रुपये (US$ 7,685) ट्रान्सफर केले. यासाठी दहशतवाद्यांनी VPN वापरला. तथापि, PayPal ने आरोपीचे खाते निलंबित केले, जेणेकरून ते यापुढे अशा प्रकारे पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत. 2022 मध्ये एका व्यक्तीने गोरखनाथ मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर विळ्याने हल्ला केला होता.
हेही वाचा - पाकिस्तान मुर्दाबाद टॉयलेट टाइल्समधून पाकचा निषेध
दहशतवाद्यांकडून ऑनलाइन शॉपिंगचा वापर -
दरम्यान, FATF ने म्हटले आहे की दहशतवादी हल्ल्यांसाठी आता नवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल मनी ट्रान्सफरचा वापर केला जात आहे. तथापी, जून 2025 मध्ये FATF ने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि देशांना दहशतवादी कारवायांशी लढण्याचे आवाहन केले. FATF च्या अहवालात असेही नमूद केले आहे की, अनेक देश अजूनही दहशतवादी संघटनांना मदत करत आहेत.