मुंबई : अमेरिकेने तहव्वूर राणाला भारताकडे हस्तांतरित केले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. तहव्वूर राणाला दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज आहे. तिथेच एनआयएचे अधिकारी कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीचे नेतृत्व आयपीएसच्या महाराष्ट्र कॅडरचे 1990 च्या बॅचचे अधिकारी सदानंद दाते करणार आहेत.
दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आली आहे. मुंबईत राणाला आर्थर रोड कारागृहात कसाबच्या कोठडीत डांबणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अखेर अमेरिकेनेतून तहव्वूर राणाला भारतात आणले आहे.
कोण आहे तहव्वूर राणा ?
मुंबई हल्ल्याच्या 405 पानी आरोपपत्रात तहव्वूर राणाचा उल्लेख आहे. राणा आयएसआय आणि लष्कर ए तैयबाचा दहशतवादी आहे. 26/11 हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा आरोप राणावर आहे. हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून राणाने मदत केली असल्याचा देखील आरोप आहे. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे. तसेच मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा देखील आरोप आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं; प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड
डॉक्टर बनला दहशतवादी
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचावणी येथे तहव्वूर राणाचा जन्म झाला. तहव्वूर राणाने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. 1997नंतर कॅनडामध्ये वास्तव्यास होता. 2001 मध्ये कॅनेडियन नागरिकत्व मिळवलं. शिकागो येथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली.
हेडलीला राणाची साथ
तहव्वूर राणाची शिकागोमध्ये हेडलीशी मैत्री झाली. दोघेही जुने मित्र होते परंतु भेटीने मैत्री पुन्हा घट झाली. मुंबई हल्ल्यापूर्वी 2006 ते 2008 पर्यंत हेडलीने अनेकदा भारताला भेट दिली. मुंबईत तहव्वूर राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा आहे. राणाच्या फर्मकडून हेडलीला 5 वर्षांच्या बिझनेस व्हिसासाठी मदत करण्यात आली होती. राणाकडून हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करण्यात आली.