Leader of Opposition in Delhi Assembly: दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाने आज विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली. आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कालकाजी विधानसभेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. आता, दिल्ली विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खंडाजगी पाहायला मिळणार आहे. कारण, आता दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील एक महिला आहेत. तसेच आपने विरोधी पक्षनेते म्हणून एका महिलेची निवड केली आहे.
हेही वाचा - Punjab AAP Politics : ही चेष्टा म्हणायची की काय..? अस्तित्वात नसलेलं खातं ‘आप’च्या मंत्र्याने तब्बल 20 महिने चालवलं!
आतिशी यांनी यापूर्वी केजरीवाल यांच्या अटेकेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर अतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे पक्षात त्यांची प्रतिष्ठा वाढली. या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आप पक्षाचा पराभव झाला होता. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत आपला फक्त 22 जागांवर विजय मिळवता आला.
हेही वाचा - RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली नियुक्ती
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारखे मोठे नेते पराभूत झाले. तथापि, कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांनी निवडणूक जिंकली. दुसरीकडे 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्तेत आलेल्या भाजपने एका महिलेला मुख्यमंत्री बनवले आहे. त्यामुळे आपने आता एका महिला विरोधी पक्षनेत्याला निवडून भाजपला कट्टर टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आप निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेत आहे. आता आप जिल्हा आणि प्रभाग पातळीवरील अधिकारी बदण्याची शक्यता आहे. जेणेकरून स्थानिक निवडणुकीत त्यांना सत्ता मिळवता येईल. तथापी, आप पक्षाचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी सांगितलं की, संघटनेतील सर्व पदांची पुनर्रचना केली जाईल.