Wednesday, August 20, 2025 12:44:57 PM

इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाईल्सपर्यंत अमेरिकेच्या 25 टक्के टॅरिफचा भारतावर काय परिणाम होणार?

या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ऑटोमोबाईल्सपर्यंत अमेरिकेच्या 25 टक्के टॅरिफचा भारतावर काय परिणाम होणार
US Tariffs On India
Edited Image

US Tariffs On India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील निर्यात वस्तूंवर 25 टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय 1 ऑगस्टपासून लागू होणार असून त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कराची घोषणा होताच GIFT निफ्टीमध्येही 174 अंकांची म्हणजेच 0.70 टक्क्यांची घसरण झाली. 

सर्वाधिक फटका बसणारे उद्योग:

कापड आणि वस्त्र उद्योग

अमेरिका भारताचा सर्वात मोठा कापड व फूटवेअर आयातदार देश आहे. 25 % करामुळे या वस्तू महाग होतील, परिणामी अमेरिकन ग्राहकांमध्ये या वस्तूंची मागणी घटेल.

दागिने आणि हिरे

भारत हा जगातील आघाडीचा हिरे निर्यातदार आहे. कर वाढल्याने भारतीय हिरे महाग होतील, आणि अमेरिका बाजारात त्यांची स्पर्धा कमी होईल.

ऑटोमोबाईल्स आणि ऑटो पार्ट्स

स्टील व अॅल्युमिनियमवर आधीच जास्त कर आहे. आता ऑटो क्षेत्रावरही टॅरिफ आल्यास निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा - US Tariffs on India: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! भारतावर लादला 25 टक्के कर

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि केमिकल्स

भारत अमेरिकेला 14 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करतो. नव्या टॅरिफमुळे या क्षेत्रालाही मोठा फटका बसू शकतो. 

हेही वाचा - हिंदू भावनांशी छेडछाड! चीनच्या अलीएक्सप्रेसने पायपुसणीवर छापला भगवान जगन्नाथाचा फोटो

दरम्यान, भारतावर टॅरिफ लादताना ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'भारत आमचा मित्र आहे, पण त्याने अमेरिकेवर जगातील सर्वाधिक टॅरिफ लादले आहेत. तसेच, भारताचे गैर-मौद्रिक अडथळे व्यापारास अडथळा ठरत आहेत.' तथापी, ट्रप्म यांनी युक्रेन युद्धात भारताच्या अप्रत्यक्ष सहभागाबद्दल नाराजी व्यक्त करत, रशियाकडून तेल व शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल भारताला दंड लावण्याचा इशारा दिला. 
 


सम्बन्धित सामग्री