Nitin Gadkari On Road Safety: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता प्रत्येक दुचाकीसोबत दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक असेल. नवी दिल्ली येथे झालेल्या ऑटो समिट दरम्यान हा निर्णय घेण्यात आला, ज्याला टू-व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (THMA) चा पूर्ण पाठिंबा आहे. गडकरी यांचे हे पाऊल भारतीय रस्ते सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रलंबित बदल मानला जात आहे, ज्याचा उद्देश दुचाकी अपघातांमध्ये होणारे अनावश्यक मृत्यू रोखणे आहे.
रस्ते अपघात कमी होण्यास होणार मदत -
भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी खूपच चिंताजनक आहे. दरवर्षी 4,80,000 हून अधिक रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे 1,88,000 लोक आपला जीव गमावतात. यातील बहुतेक मृत 18 ते 45 वयोगटातील आहेत. दरवर्षी दुचाकी अपघातांमध्ये 69,000 हून अधिक मृत्यू होतात, त्यापैकी 50% मृत्यू हेल्मेट न घालण्यामुळे होतात.
दरम्यान, THMA चे अध्यक्ष राजीव कपूर यांनी म्हटलं की, 'हा केवळ एक नियम नाही तर देशाची आवश्यकता आहे. रस्ते अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसाठी हा आशेचा किरण आहे, जेणेकरून अशा दुर्घटना आता रोखता येतील.' तथापि, या निर्णयाला पाठिंबा देत, हेल्मेट उत्पादक संघटनेने आश्वासन दिले की ते आयएसआय प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन वाढवतील आणि देशभरात त्यांची उपलब्धता सुनिश्चित करतील.
हेही वाचा - फक्त दोन वर्षे..! भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेइतके नव्हे तर त्याहून अधिक चांगले असेल; नितीन गडकरी यांचा मोठा दावा
रस्ते सुरक्षेतील एक मैलाचा दगड -
दरम्यान, नितीन गडकरींच्या या उपक्रमाला रस्ते सुरक्षेतील एक मैलाचा दगड म्हणून वर्णन करताना राजीव कपूर म्हणाले की, 'हे पाऊल भारतात सुरक्षित आणि जबाबदार दुचाकी प्रवासाच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल.'
हेही वाचा - Nitin Gadkari On Electric Cars: 6 महिन्यांत पेट्रोल कारच्या किमतीत इलेक्ट्रिक कार उपलब्ध होणार; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा!
हेल्मेट न घालल्यास 2000 रुपयांपर्यंत दंड -
तथापि, भारत सरकारने मोटार वाहन कायदा 1998 मध्ये सुधारणा केली असून या अंतर्गत आता दुचाकी चालकांना हेल्मेट न घालल्यास किंवा हेल्मेट योग्यरित्या न घातल्यास 2000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. जर दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असेल पण ते व्यवस्थित घातले नसेल, जसे की, हेल्मेटचा पट्टा सैल असेल किंवा उघडा असेल, तर त्याच्याकडून 1000 रुपये दंड आकारला जाईल.