नवी दिल्ली: EPFO कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत येणाऱ्या 97 टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8.25 टक्के व्याज हस्तांतरित करण्यात आले आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना व्याज देण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2014 या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती, जी डिसेंबरमध्ये पूर्ण झाली.
हेही वाचा - अमेझॉनवर वस्तू खरेदी करणे झाले महाग! कंपनी आता आकारणार मार्केटप्लेस फी
33.56 कोटी EPFO कर्मचाऱ्यांना मिळाले व्याजाचे पैसे -
दरम्यान, केंद्रीय मंत्री मांडविया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये व्याज देण्याची प्रक्रिया जलद प्रक्रियेसाठी बदलण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली आहे. 2025 या आर्थिक वर्षासाठी, 33.56 कोटी खात्यांसह 13.88 लाख कंपन्यांचे वार्षिक खाते अपडेट करायचे होते, त्यापैकी 8 जुलैपर्यंत 13.86 लाख कंपन्यांच्या 32.39 कोटी खात्यांमध्ये 8.25 टक्के दराने व्याजाचे पैसे जमा झाले आहेत.
हेही वाचा - 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
उर्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यातही जमा होणार पैसे -
मांडविया यांनी सांगितलं की, उर्वरित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातही व्याजाची रक्कम या आठवड्यात जमा केली जाईल. केंद्र सरकारने व्याजदर जाहीर केल्यानंतर ईपीएफओ दरवर्षी ईपीएफ सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करते. 2024-25 साठी, केंद्राने 22 मे रोजी ईपीएफओ सदस्यांसाठी 8.25 टक्के व्याजदराने ठेवी मंजूर केल्या होत्या.