नवी दिल्ली: जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या UPI अॅप्सद्वारे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
GST लागू होण्याची अफवा का पसरली?
बेंगळुरूमधील सुमारे 6,000 व्यापाऱ्यांना त्यांच्या UPI व्यवहारावरून GST नोटिसा मिळाल्या होत्या. या बातमीनंतर दिल्लीसारख्या इतर शहरांमधील अनेक दुकानदारांनीही यूपीआयद्वारे पेमेंट घेण्यास मनाई करण्यास सुरुवात केली. सामान्य लोक आणि व्यापाऱ्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की कदाचित सरकार आता यूपीआय पेमेंटवरही कर लादणार आहे. परिणामी, दिल्लीसह अनेक शहरांतील दुकानदारांनी UPI पेमेंट घेणे थांबवले.
हेही वाचा - यूट्यूब, इंस्टाग्रामवरून पैसे कमावताय? मग ‘या’ पद्धतीने भरा कर; सरकारने बदलले नियम
सरकारचे संसदेत स्पष्टीकरण -
दरम्यान, या अफवांवर 22 जुलै रोजी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत उत्तर देत स्पष्ट केले की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. GST कौन्सिलनेही अशी कोणतीही शिफारस केलेली नाही.
हेही वाचा - तुमच्या नावावर कोणी बनावट कर्ज घेतले आहे का? पॅन कार्डच्या मदतीने एका क्लिकवर जाणून घ्या
सरकारच्या या निर्णयामुळे आता व्यापाऱ्यांचा डिजिटल पेमेंटवर विश्वास वाढणार असून नोटिसा मिळण्याच्या भीतीने UPI टाळणारे व्यापारी आता पुन्हा डिजिटल पेमेंट स्वीकारतील. तथापी, कोणताही अतिरिक्त कर न लागल्याने सामान्य नागरिक पूर्वीप्रमाणे UPI वापरणे सुरू ठेवू शकतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार अधिक गती घेतील. तथापी, आता हे स्पष्ट झाले आहे की, UPI व्यवहार सुरक्षित आहेत. तसेच त्यावर कोणताही GST लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता डिजिटल व्यवहार सुरू ठेवावेत.