Monday, September 01, 2025 06:10:57 PM

Parivartini Ekadashi 2025: परिवर्तिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे महत्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

सण आणि व्रत भारतीय संस्कृतीत धार्मिक श्रद्धेचे महत्व दर्शवतात. त्यापैकीच एक महत्वाचे व्रत म्हणजे परिवर्तिनी एकादशी.

parivartini ekadashi 2025 परिवर्तिनी एकादशी कधी आहे जाणून घ्या व्रताचे महत्व शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Parivartini Ekadashi: सण आणि व्रत भारतीय संस्कृतीत धार्मिक श्रद्धेचे महत्व दर्शवतात. त्यापैकीच एक महत्वाचे व्रत म्हणजे परिवर्तिनी एकादशी. हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशीला साजरे केले जाते आणि या वर्षी तो 3 सप्टेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते, यामुळे भक्तांची पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

परिवर्तिनी एकादशीला पद्मा एकादशी, पार्श्व एकादशी किंवा जयंती एकादशी असेही संबोधले जाते. पुराणानुसार, भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेत असताना कूस बदलतात घेतात, म्हणूनच या एकादशीला ‘परिवर्तिनी’ असे नाव पडले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात धर्मराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवादात या व्रताचे महत्त्व सांगितले आहे.

या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करणे आणि व्रताचे संकल्प करणे आवश्यक आहे. पूजेची तयारी करताना पूजा स्थळ स्वच्छ ठेवावे आणि थोडे गंगाजल वापरून पवित्रता निर्माण करावी. पूजा चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती ठेवून तिला टिळक आणि फूल-माळांनी सजवावे. तुपाचा दिवा लावून भगवानाला फळ , फूल, तुळस, नैवेद्य अर्पण केले जातात.

पुजनामध्ये 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो' आणि 'श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय' असे मंत्र जपले जातात. भक्त व्रत कथा ऐकतात किंवा वाचतात, ज्यामुळे धार्मिक अनुष्ठान पूर्ण होते. संपूर्ण दिवस उपवास ठेवावा किंवा फळाहार करावा. पुढील दिवशी व्रत पारण केले जाते, जे व्रतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.

परिवर्तिनी एकादशीचे पालन केल्याने केवळ आध्यात्मिक फळ मिळत नाही तर जीवनातील संकटे दूर होतात आणि मानसिक शांतता अनुभवता येते. तसेच, याच्या माध्यमातून आरोग्य, धन, सुख आणि मोक्ष मिळवण्याचा मार्ग खुला होतो. हे व्रत श्रद्धा आणि भक्तीने केल्यास, भक्ताला भगवान विष्णूंच्या चरणी स्थान प्राप्त होते, असे पुराणात सांगितले आहे.

तर, या वर्षी 3 सप्टेंबर 2025 रोजी परिवर्तिनी एकादशीला व्रत करून, भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करा आणि जीवनातील पापमुक्तीचा अनुभव घ्या.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री