Himani Narwal Murder Case
Edited Image
Himani Narwal Murder Case: हरियाणातील रोहतक येथील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तथापि, आरोपीने हिमानी यांच्या हत्येमागील कारण देखील सांगितलं आहे. हिमानीच्या हत्येमागे ब्लॅकमेलिंग हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमानी हत्याकांडात पोलिसांनी आरोपी सचिनला अटक केली आहे. सचिनने कबूल केले आहे की, त्यानेच हिमानीची हत्या केली होती.
हिमानी नरवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा -
हिमानी नरवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. सचिनने पोलिसांना सांगितले आहे की, तो आणि हिमानी एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. हिमानी व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करत होती. ती पैशांची मागणी करत होती. यानंतर सचिनने ही हत्या केली. तथापि, हिमानीच्या आईचा दावा आहे की, तिच्या मुलीच्या हत्येमागे राजकीय कारण आहे.
हेही वाचा - Swargate Bus Stand Rape Case : स्वारगेट प्रकरणात नवीन ट्विस्ट?, आरोपी दत्ता गाडेच्या भावाची धक्कादायक भूमिका
हिमानीची हत्या करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक -
दरम्यान, हिमानी हत्या प्रकरणावर अतिरिक्त पोलिस महासंचालक केके राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिमानी नरवाल हत्याकांडात पोलिसांना मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. त्या प्रकरणातील आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव सचिन आहे. तो झज्जर जिल्ह्यातील खैरपूर गावचा रहिवासी आहे.
हेही वाचा - रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटोसमोर; छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती
हिमानी नरवाल यांची चार्जिंग वायरने गळा दाबून हत्या -
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री आरोपीचे मृत हिमानीशी भांडण झाले. त्यानंतर आरोपीने मोबाईलच्या चार्जिंग वायरचा वापर करून हिमानीचा गळा दाबून खून केला. 28 फेब्रुवारी रोजी, हत्या केल्यानंतर आरोपी दागिने घेऊन झज्जरला पळून गेला. तो रात्री परत आला आणि मृतदेह एका सुटकेसमध्ये घेऊन गेला. आरोपी सचिनने हिमानीचा मृतदेह सांपला बस स्टँडजवळ फेकून दिला होता. हिमानीचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.