नवी दिल्ली : चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये कोरोनाची एक नवीन लाट आली आहे. सिंगापूरमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नवीन ओमिक्रॉन सबव्हेरियंट्स JN.1 आणि LF7 हे याचे कारण आहेत. मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोविडची लागण झाली आहे.
कोविड-19 ने संपूर्ण जगाला घरात कोंडून राहण्यास भाग पाडले होते. तोच पुन्हा एकदा परतला आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंड सारख्या आशियाई देशांमध्ये कोविड-19 ची एक नवीन लाट उदयास आली आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या या परिणामामुळे जगभरात चिंता वाढली आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोविडची लागण झाली आहे. कोविड-19 प्रकरणांमध्ये या वाढीचे मुख्य कारण नवीन ओमिक्रॉनचे (Omicron) सबव्हेरियंट्स JN.1 आणि त्याच्याशी संबंधित प्रकार LF7 असल्याचे मानले जाते.
हेही वाचा - COVID-19 Cases in India: भारतात एका आठवड्यात 164 कोरोना रुग्णांची नोंद; केरळ आणि महाराष्ट्र आघाडीवर
सिंगापूरमध्ये, मे 2025 च्या सुरुवातीला प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढून 14,000 पेक्षा जास्त झाली. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 11,100 होती. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे, परंतु, आयसीयू केसेसमध्ये किंचित घट झाली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याचा प्रकार मागील प्रकारांच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर नाहीत. या वाढीचे कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असू शकते. सध्या LF.7 आणि NB.1.8 हे प्रमुख व्हेरिएंटस आहेत. ते JN.1 चे उपप्रकार आहेत.
हे JN.1 स्ट्रेन काय आहे?
JN.1 हा ओमिक्रॉन BA.2.86 (Omicron BA.2.86) चा वंशज आहे. याला ऑगस्ट 2023 मध्ये ओळखले गेले होते. डिसेंबर 2023 मध्ये, WHO ने त्याला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकृत केले. या प्रकारात सुमारे 30 म्युटेशन्स होतात. ती रोगप्रतिकारक शक्तीच्या तडाख्यातून सुटण्यासाठी झालेली असतात. ही त्यावेळच्या इतर व्हेरिएंटसपेक्षा जास्त होती. मात्र, BA.2.86 हा SARS-CoV-2 चा प्रचलित प्रकार 2023 च्या अखेरीपर्यंत समोर आला नव्हता. BA.2.86 चा वंशज JN.1, आता एक किंवा दोन अतिरिक्त उत्परिवर्तनांमुळे (mutations) अधिक प्रभावीपणे पसरू शकतो. या म्युटेशनमुळे त्याच्या पूर्वजांप्रमाणेच त्याच्यामध्ये मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्याचा गुणधर्म दिसून येतो. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे म्हणणे आहे की, JN.1 आता अधिक प्रभावीपणे पसरण्यासाठी विकसित झाला आहे. सिंगापूरमध्ये सांडपाण्यात कोविड-19 विषाणू आढळून आला आहे. पण, हा नवीन प्रकार पूर्वीपेक्षा वेगाने पसरणार आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या चारही क्षेत्रांमध्ये साथीच्या 12 व्या आठवड्यात JN.1 हा प्रकार सर्वात सामान्य SARS-CoV-2 प्रकार राहिला, ज्याचा वाटा पश्चिम पॅसिफिक प्रदेशात (WPR) 93.9%, आग्नेय आशिया प्रदेशात (SEAR) 85.7%, युरोपियन प्रदेशात (EUR) 94.7% आणि अमेरिका प्रदेशात (AMR) 93.2% होता.
सध्याच्या कोविड-१९ लसी JN.1 स्ट्रेनवर काम करतील का?
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, JN.1 या व्हेरिएंटला निष्क्रिय करणे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी कठीण आहे. जिवंत विषाणू आणि प्रयोगशाळेत बनवलेल्या स्यूडोव्हायरस वापरून केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, लसीकरण किंवा पूर्वीच्या संसर्गाद्वारे मिळवलेल्या अँटीबॉडीज JN.1 या व्हेरिएंटवर पूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कमी प्रभावी ठरत आहेत. याचा अर्थ असा की, JN.1 शरीराच्या विद्यमान रोगप्रतिकारक शक्तीला अंशतः टाळू शकतो. XBB.1.5 मोनोव्हॅलेंट बूस्टर ही COVID-19 लस विशेषतः ओमिक्रॉनच्या XBB.1.5 सबव्हेरियंटला लक्ष्य करण्यासाठी डिझाइन केलेली होती. अनेक अभ्यासांमध्ये JN.1 या व्हिरिएंटविरुद्ध संरक्षण वाढविण्यात ही लस प्रभावी आढळली आहे, असे WHO ने म्हटले आहे.
हेही वाचा - जगभरात दरवर्षी 30 लाख मुलांचा मृत्यू! औषधांचा अतिवापर चिमुकल्यांसाठी अशा पद्धतीने ठरतोय जीवघेणा!