Landslide on Mata Vaishno Devi Marg: जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या अर्धकुवारी परिसरात सोमवारी मोठे भूस्खलन झाले. इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ घडलेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, 'अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीसह बचावकार्य सुरू आहे. जय माता दी.'
6 प्रवासी गंभीर जखमी
भूस्खलनाच्या वेळी अनेक यात्रेकरू मार्गावर उपस्थित होते. बचाव पथकांनी तत्काळ कार्यवाही केली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 6 प्रवासींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर खबरदारी म्हणून वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
हेही वाचा - Tawi River Flood Alert to Pakistan : तावी नदीच्या संभाव्य मोठ्या पुराबद्दल भारताने पाकिस्तानला केली सूचना
डोडा येथे ढगफुटीचा तडाखा -
दरम्यान, जम्मू विभागात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. डोडा येथे ढगफुटी झाली असून, 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. जम्मूमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 10 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - Supreme Court On Vantara : वनताराला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
नेटवर्क सेवा खंडित
सततच्या पावसामुळे अनेक भागात नेटवर्क बंद पडले असून, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.