मुंबई: बॉलिवूडमध्ये सतत वादग्रस्त राहिलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तिच्या संन्याशीण झाल्यानंतरही वादात अडकली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ममताने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरपद मिळवले. ममताच्या यापदावर अनेक आखाड्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यानंतर तिला व तिला महामंडलेश्वर करणाऱ्या डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना व ममताला किन्नर आखाड्यातून काढल्याची घोषणा अजय दास यांनी केली होती. त्यावर ममताने स्वतःहून यापदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले.डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर अनेकांनी केलेल्या खोट्या आरोपामुळे आपण महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता. आता त्रिपाठी यांनी ममताला महामंडेलश्वर पदी पुन्हा नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. किन्नर आखाड्याच्या पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर डॉ.लक्ष्मण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी म्हणजेच यमाई ममता नंद गिरी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे आणि राहील. ममता कुलकर्णीने राजीनामा दिला असला तरी आम्ही राजीनामा स्वीकारलेला नाही, असं ठामपणे सांगितलं आहे.
ममताची व्हायरल पोस्ट
त्रिपाठींवर काही लोकांनी चुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे दु:ख झालं आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. आखाड्याला 2 लाख रूपयांच्या वस्तू दिल्या आहेत. महामंडलेश्वर झाल्यानंतर मी माझ्या गुरूंना छत्री, काठी भेट दिली आहे. उर्वरीत रक्कम आपण अन्नदानासाठी दिली आहे. मी माझ्या गुरूंची आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा हे पद दिलं. भविष्यात मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला समर्पित करणार असल्याचे ममता कुलकर्णीने सांगितले.
हेही वाचा : सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची गुप्तभेट! 'मुंडे विरोधातील लढा आणि भेट' या 2 वेगेवेगळ्या गोष्टी; धसांचे स्पष्टीकरण
वादग्रस्त कारकीर्द असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यातही वादग्रस्त राहिली आहे.आता सन्यांस घेण्याचा निर्णय घेतल्यावर तेथेही ममतावरून वाद निर्माण झाला आहे. ममता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कशी राहू शकते असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. ममताचा हा प्रसिद्धीकरता स्टंट असावा असंही नेटकऱ्यांनी म्हटलं असून ममताच्या संन्याशीण बनण्यावर चौफर टीका होत आहे.