Indian Railway: भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी रेल्वे व्यवस्था आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वेची विश्वासार्हता आणि महत्त्व खूप मोठं आहे. मात्र, रेल्वेच्या विविध कामांमुळे अनेक वेळा गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाते किंवा गाड्या रद्द होतात, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
ऑगस्ट 2025 महिन्यातही झारखंड आणि त्यालगतच्या परिसरात होणाऱ्या ट्रॅक देखभाल व तांत्रिक कामांमुळे अनेक गाड्यांचे संचालन रद्द करण्यात आले आहे. विशेषतः चक्रधरपूर रेल्वे मंडळात सुरू असलेल्या मेंटेनन्समुळे रांचीमार्गे धावणाऱ्या गाड्या प्रभावित होणार आहेत.
कोणत्या गाड्या रद्द होणार आहेत?
18175/18176 हटिया – झारसुगुडा – हटिया मेमू एक्सप्रेस
ही गाडी 18 ऑगस्ट 2025 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान रद्द राहणार आहे.
17007 चर्लपल्ली – दरभंगा एक्सप्रेस (वाया रांची)
26 ऑगस्ट व 9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द राहणार आहे.
17008 दरभंगा – चर्लपल्ली एक्सप्रेस (वाया रांची)
29 ऑगस्ट व 12 सप्टेंबर 2025 रोजी रद्द केली जाईल.
18523 विशाखापट्टणम – बनारस एक्सप्रेस (वाया रांची)
27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 7 व 10 सप्टेंबर 2025 रोजी बंद राहणार आहे.
18524 बनारस – विशाखापट्टणम एक्सप्रेस (वाया रांची)
28 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 8 व 11 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
17005 हैदराबाद – रक्सौल एक्सप्रेस (वाया रांची)
28 ऑगस्ट 2025 रोजी रद्द.
17006 रक्सौल – हैदराबाद एक्सप्रेस (वाया रांची)
31 ऑगस्ट 2025 रोजी रद्द.
07051 व 07052 चर्लपल्ली – रक्सौल स्पेशल (वाया रांची)
30 ऑगस्ट व 2 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
07005 व 07006 चर्लपल्ली – रक्सौल स्पेशल (वाया रांची)
1 व 4 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
18310 जम्मू तवी – संबलपूर एक्सप्रेस (वाया रांची)
7 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
18309 संबलपूर – जम्मू तवी एक्सप्रेस (वाया रांची)
9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
13425 मालदा टाउन – सूरत एक्सप्रेस (वाया रांची)
6 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
13426 सूरत – मालदा टाउन एक्सप्रेस (वाया रांची)
8 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
15028 गोरखपूर – संबलपूर एक्सप्रेस
8 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
15027 संबलपूर – गोरखपूर एक्सप्रेस
9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द.
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
15028 गोरखपूर: संबलपूर एक्सप्रेस
23, 25, 27, 29 व 31 ऑगस्ट 2025 रोजी हटिया येथे शॉर्ट टर्मिनेट.
15027 संबलपूर: गोरखपूर एक्सप्रेस
24, 26, 28, 30 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2025 रोजी हटियाहून सुरु होईल.
प्रवाशांसाठी सूचना
ज्या प्रवाशांनी या मार्गावर प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांनी स्टेशनवर जाण्यापूर्वी रेल्वेची अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक माहिती केंद्रावरून ताज्या अपडेट्स तपासाव्यात, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही.