मुंबई: आधीच जाहीर केलेल्या 250 गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त, मध्य रेल्वे 44 गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे आणि दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी 2 सेवा वाढवून करणार आहे. येत्या गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या फायद्यासाठी आतापर्यंत घोषित एकूण 296 गणपती विशेष ट्रेन चालणार आहेत.
अतिरिक्त 44 गणपती विशेष ट्रेनचा तपशील खाली दिला आहे:
1) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण 8 सेवा)
01131 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक 28.8.2025, 31.8.2025, 4.9.2025 आणि 7.9.2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 08.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 22.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)
01132 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक 28.8.2025, 31.8.2025, 4.9.2025 आणि 7.9.2025 रोजी सावंतवाडी रोड येथून 23.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण 4 सेवा)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
संरचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.
2) दिवा -खेड -दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (36 सेवा)
01133 मेमू विशेष ट्रेन 22.8.2025 ते 8.9.2025 पर्यंत दिवा येथून दररोज दुपारी 13.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 20.00 वाजता खेड येथे पोहोचेल. (एकूण 18 सेवा)
01134 मेमू विशेष ट्रेन 23.8.2025 ते 9.9.2025 पर्यंत खेड येथून दररोज सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.00 वाजता दिवा येथे पोहोचेल. (एकूण 18 सेवा)
थांबे: निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.
संरचना :8 कोचची मेमू रेक्स (8 कार मेमू रेक्स)
3) दिवा– चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार
ट्रेन क्रमांक 01155/01156 दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या 2 अतिरिक्त फेऱ्यांनी विस्तार करण्यात आलेला आहे. 01155 दिवा–चिपळूण विशेषची १ फेरी आणि
01156 चिपळूण–दिवा विशेषची 1 फेरी वाढवण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या 38 अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता एकूण 40 अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता 22.08.2025 ते 10.09.2025 या कालावधीत चालवण्यात येतील.
आरक्षण:
गणपती विशेष ट्रेन क्रमांक 01131 साठी आरक्षण 3.8.2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित कोचचे बुकिंग यूटीएस सिस्टमद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानासाठी सामान्य शुल्क आकारले जाते. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.