Sunday, August 31, 2025 06:48:25 AM

खुशखबर ! म्हाडाची नवीन वर्षात लॉटरी मुंबईत 2500 ते 3000 घरांची संधी

खुशखबर  म्हाडाची नवीन वर्षात लॉटरी मुंबईत 2500 ते 3000 घरांची संधी

 

मुंबई: नवीन वर्षाचं स्वागत अनेक जण आपल्या स्वप्नांसह करतात. अनेकांचे स्वप्न असते की, त्यांच्या कुटुंबासाठी स्वतःचं घर असावं. पण मुंबईतील वाढत्या घरांच्या किंमतीमुळे घर घेणं अनेकांना कठीण वाटतं. मात्र, 2025 मध्ये तुमचं घर घेण्याचं स्वप्न वास्तविक होऊ शकतं. मुंबईत नव्या वर्षात म्हाडाकडून 2500 ते 3000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

हे घर मुंबई उपनगरातील विविध मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध असतील, आणि त्यामध्ये अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाअधिक घरे राखीव ठेवण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे. यंदाच्या लॉटरीत मुंबई उपनगरातील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव आणि सायन या प्रमुख परिसरांमध्ये घरं उपलब्ध होऊ शकतात.

म्हाडा दरवर्षी साधारणपणे दोन वेळा लॉटरी काढते, पण मुंबईतील घरांसाठी अत्यधिक प्रतिसाद मिळतो. 400-500 घरांच्या लॉटरीसाठी देखील लाखो अर्ज भरले जातात. त्यामुळे, यंदा म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कधी स्वीकारले जातील, याची उत्सुकता सर्वत्र आहे.
 


सम्बन्धित सामग्री