Sunday, September 14, 2025 03:32:17 PM

Food Poisoning: दौसामध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा; 90 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

शुक्रवारी पोषण आहार घेतल्यानंतर पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्याने तब्बल 90 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

food poisoning दौसामध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा 90 विद्यार्थी रुग्णालयात दाखल 6 जणांची प्रकृती चिंताजनक

Food Poisoning In Government School: राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील चुडियावास येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत मध्यान्ह भोजनातून विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी पोषण आहार घेतल्यानंतर पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्याने तब्बल 90 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. काहींना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र रविवारी पुन्हा 6 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दौसा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी 24 तास देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्नातून विषबाधेचा संशय

शुक्रवारी शाळेतील 156 विद्यार्थ्यांनी चपाती आणि भाजीचे जेवण केले होते. त्यानंतर काही तासांतच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. प्राथमिक तपासणीत अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे 49 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात, तर इतरांना नांगल राजावतन सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - Waqf Amendment Act 2025: केंद्राचा वक्फ कायदा योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय 15 सप्टेंबरला देणार निकाल

प्रभारी निलंबित, चौकशी सुरू

गंभीर निष्काळजीपणानंतर मध्यान्ह भोजन प्रभारी रामजीलाल मौर्य यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कार्यवाहक मुख्याध्यापक तरुण कौशिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करून प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले आहेत.

हेही वाचा - AI Video PM Modi's Mother: पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईचा AI व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी काँग्रेस आणि IT सेलच्या नेत्यांविरुद्ध FIR दाखल

पालकांचा संताप

या घटनेनंतर पालक व ग्रामस्थांनी शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आधीपासूनच मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप केला. स्वच्छतेच्या अभावावरूनही शाळेच्या स्वयंपाकघरावर टीका करण्यात आली. प्रशासनाने पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी सर्व शाळांना कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री