Wednesday, August 20, 2025 01:09:43 PM

धक्कादायक! 'या' राज्याच्या गेल्या 4 वर्षात 36000 हून अधिक महिला आणि 8400 हून अधिक मुले बेपत्ता

2020 ते 2024 दरम्यान राज्यात 8,403 मुलांसह एकूण 36,420 महिला बेपत्ता झाल्या आहेत. दलालाच्या माध्यमातून 421 महिला आणि मुलींची राज्याच्या सीमेपलीकडे तस्करी करण्यात आली.

धक्कादायक या राज्याच्या गेल्या 4 वर्षात 36000 हून अधिक महिला आणि 8400 हून अधिक मुले बेपत्ता
Missing person
Edited Image

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सोमवारी राज्यातील धक्कादायक माहिती उघड केली. गेल्या 4 वर्षांत ओडिशामध्ये 36000 हून अधिक महिला आणि 8400 हून अधिक मुले बेपत्ता झाले आहेत. ओडिशातील या चिंताजनक घटनेबाबत मुख्यमंत्री मोहन माझी यांनी विधानसभेत धक्कादायक तथ्ये सादर केली. सोमवारी ओडिशा विधानसभेत आमदार चक्रमणी कन्हार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मुख्यमंत्री मोहन माझी यांनी बेपत्ता महिला आणि मुलांची धक्कादायक संख्या उघड केली. 

हेही वाचा - 19 शहरांमध्ये सर्व दारूची दुकाने बंद राहणार; 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन धोरण

मुख्यमंत्री मोहन माझी यांनी सांगितलं की, 2020 ते 2024 दरम्यान राज्यात 8,403 मुलांसह एकूण 36,420 महिला बेपत्ता झाल्या आहेत. दलालाच्या माध्यमातून 421 महिला आणि मुलींची राज्याच्या सीमेपलीकडे तस्करी करण्यात आली. परिणामी, कायदा अंमलबजावणी संस्थांनी या बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या 453 मध्यस्थांना ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - जयललिता यांची जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित

1417 महिला आणि 1857 मुलांची सुटका - 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार वर्षांत 1417 महिला आणि 1857 मुलांची सुटका करण्यात आली आहे. तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंदवून पोलिस तस्करी झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी कारवाई करत असल्याचे मुख्यमंत्री माझी यांनी यावेळी सभागृहात सांगितले. महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी 36 एकात्मिक मानव तस्करी विरोधी युनिट्स स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, बोलंगीर, नुआपाडा, बारगड, कालाहांडी, संबलपूर आणि झारसुगुडा येथे अशा प्रकरणांना हाताळण्यासाठी IAHTU ला संपर्क केंद्र बनवण्यात आल्याचंही यावेळी माझी यांनी सांगितलं. 2024 मध्ये ओडिशामध्ये महिलांच्या अपहरणाचे 6,437 गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत 413 लोकांना अटक करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री