Sunday, August 31, 2025 05:47:13 PM

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज NDA ची बैठक; 20 मुख्यमंत्री, 18 उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

एनडीए शासित 20 राज्य सरकारांचे एकूण 20 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. भाजपच्या 'सुशासन सेल' कडून या बैठकीचा समन्वय साधला जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज nda ची बैठक 20 मुख्यमंत्री 18 उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
NDA meeting प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज NDA ची बैठक होणार आहे. यात शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत 'सुशासन आणि सर्वोत्तम पद्धती' या विषयावर एक दिवसीय विचारमंथन बैठकीत सहभागी होतील. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहतील. एनडीए शासित 20 राज्य सरकारांचे एकूण 20 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. भाजपच्या 'सुशासन सेल' कडून या बैठकीचा समन्वय साधला जात आहे.

दोन महत्त्वाचे प्रस्ताव होणार मंजूर - 

या विचारमंथन बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव देखील मंजूर केले जातील. पहिला प्रस्ताव 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सशस्त्र दलांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक करण्याबद्दल असेल. येत्या जनगणनेत जातीचा डेटा समाविष्ट करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करणारा दुसरा ठराव मंजूर केला जाईल. बैठकीत एनडीए शासित राज्यांनी स्वीकारलेल्या सर्वोत्तम प्रशासन उपक्रमांचे सादरीकरण देखील केले जाईल. विविध राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या संबंधित सरकारांच्या सुशासन उपक्रमांची आणि नवोपक्रमांची माहिती देतील.

हेही वाचा - युट्यूबर ज्योती मल्होत्राने 3 वेळा दिली मुंबईला भेट; गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर 

आगामी प्रमुख कार्यक्रमांवर चर्चा - 

या विचारमंथन बैठकीत काही महत्त्वाच्या आगामी कार्यक्रमांवरही चर्चा केली जाईल, ज्यामध्ये एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय योग दिनाची 10 वर्षे साजरी करणे आणि 'लोकतंत्र हत्या दिवस' ​​म्हणजेच आणीबाणी लागू करण्याच्या 50 व्या वर्धापन दिनाचा समावेश आहे.

हेही वाचा Kishtwar Encounter: किश्तवाड चकमकीत महाराष्ट्राचा वीर सुपुत्र शहीद; सुरक्षा दलांनी चकमकीला दिले सडेतोड प्रत्युत्तर

नितीश कुमार उपस्थित राहणार - 

एनडीए सरकारच्या कामगिरी आणि भविष्यातील रोडमॅपबाबतची ही विचारमंथन बैठक राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे. यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश देखील उपस्थित राहणार आहेत.


सम्बन्धित सामग्री