Who is Nidhi Tewari: भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने एक आदेश जारी करून ही माहिती दिली आहे. बनारसची रहिवासी निधी तिवारी या 2014 च्या बॅचची आयएफएस अधिकारी आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहे. 29 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तिवारी यांची सह-कार्यकाळ आधारावर खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
निधी तिवारी कोण आहेत? (Who is Nidhi Tiwari)
निधी तिवारी या 2014 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहे. तिवारी सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या आयएफएस निधी तिवारी जानेवारी 2023 पासून कार्यरत आहेत. आयएफएस अधिकारी निधी नोव्हेंबर 2022 मध्ये पंतप्रधान कार्यालयात अवर सचिव म्हणून रुजू झाल्या. जानेवारी 2023 निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून काम करत आहेत.
हेही वाचा - Viral Video: एमएस धोनी बाद होताच तरुणीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना, निधी तिवारी वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (वाणिज्यिक कर) म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी नागरी सेवा परीक्षेत 96 वा क्रमांक मिळवला होता. निधी तिवारी या उत्तर प्रदेशातील वाराणसीतील महमूरगंजची रहिवासी आहेत.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी नक्षलवादाविरोधात मोठे यश! विजापूरमध्ये 50 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण
निधी तिवारी यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतील?
निधी तिवारी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांचे समन्वय साधतील, बैठका आयोजित करतील. तसेच सरकारी विभागांच्या कामकाजात समन्वय साधतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, निधीला मॅट्रिक्स लेव्हल 12 नुसार पगार मिळेल.