Monday, September 01, 2025 07:17:57 AM

दिल्लीत आता फक्त 'या' महिलांना मिळणार मोफत बस सेवेचा लाभ

नवीन सरकारने बसमध्ये महिलांच्या मोफत प्रवासाबाबत काही नवीन नियम देखील केले आहेत. महिला आणि ट्रान्सजेंडर बसमध्ये मोफत प्रवास करू शकतात, परंतु त्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.

दिल्लीत आता फक्त या महिलांना मिळणार मोफत बस सेवेचा लाभ
Free Bus Service for Delhi Women
Edited Image

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीतील महिला बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील की नाही याबद्दल सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन सरकारने बसमध्ये महिलांच्या मोफत प्रवासाबाबत काही नवीन नियम देखील केले आहेत. महिला आणि ट्रान्सजेंडर बसमध्ये मोफत प्रवास करू शकतात, परंतु त्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी, जिथे दिल्लीतील प्रत्येक महिला या सेवेचा लाभ घेऊ शकत होती, आता फक्त काही महिलांनाच याचा लाभ मिळेल, कारण नवीन सरकारने योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

दिल्लीतील मोफत बस योजनेत नवीन बदल - 

दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर, जुन्या सरकारी योजनांबाबत अनेक बदलांच्या बातम्या येत होत्या. आता फक्त दिल्लीतील रहिवासी असलेल्या महिलांनाच मोफत बस सेवेचा लाभ मिळणार आहे. या महिलांकडे  सहेली स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड मिळविण्यासाठी पहिली अट अशी आहे की महिला दिल्लीची रहिवासी असावी, म्हणजेच तिच्याकडे दिल्लीचे मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा वीज बिल असावे.

हेही वाचा - तुर्की कंपनी सेलेबीला मोठा धक्का! दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका 

तथापी, मोफत बस सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 12 वर्षांपेक्षा जास्त असावे. या वयापेक्षा जास्त वयाची कोणतीही मुलगी, ज्येष्ठ महिला आणि ट्रान्सजेंडर या सेवेचा लाभ घेऊ शकतात. कागदपत्रांबद्दल बोलायचे झाले तर, आधार कार्ड, निवासी पुरावा, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वी दिल्लीत राहणाऱ्या कोणत्याही राज्यातील रहिवासी महिलेलाही हा लाभ मिळत होता, परंतु आता तो फक्त दिल्लीतील महिलांसाठी असेल.

हेही वाचा - दिलासादायक! पूल आणि बोगदे असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर आता कमी टोल लागणार

दरम्यान, ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना त्यांच्या भाड्यात काही सवलत दिली जाईल की नाही? हे आतापर्यंत उघड झालेले नाही. लवकरच सरकार यावरही आपली भूमिका स्पष्ट करेल. सरकारच्या या योजनेचा दिल्लीतील महिला प्रवाशांना मोठा लाभ मिळणार आहे.  
 


सम्बन्धित सामग्री