Wednesday, August 20, 2025 03:49:11 PM

दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण; पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.

दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त
Edited Image

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत या हल्ल्यातील दहशतवादी पकडले जात नाहीत, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील, पण जे जवान आणि नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल. 

यावेळी सुप्रिया सुळे यांनी युद्धबंदीच्या निर्णयाचेही कौतुक केले. सुळे यांनी स्पष्ट केलं की, परदेशात पाठवण्यात आलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात त्या स्वतः होत्या आणि त्या ठिकाणी सर्व देशांनी हल्ल्याचा निषेध केला. मात्र, भारताने घेतलेल्या युद्धबंदीच्या निर्णयाबद्दल सर्व स्तरांतून प्रशंसा झाली. सुळे यांच्या या वक्तव्यानंतर संसदेत थोडा वेळ का होईना, परंतु गंभीर चर्चा रंगली. 

हेही वाचा - Operation Mahadev: श्रीनगरमध्ये चकमक; पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन सिंदूर ही जुन्या युद्धांपेक्षा वेगळी लढाई होती - 

दरम्यान, भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत भाष्य करताना याला नव्या युगाची लढाई असे संबोधले. ही लढाई पारंपरिक युद्धांपेक्षा खूप वेगळी होती. येथे केवळ सैनिक नव्हते, तर ड्रोन, बनावट माहिती, आंतरराष्ट्रीय माध्यमांतील अजेंडा या सर्वांनी युद्धाचे स्वरूप बदलले, असे तेजस्वी सूर्या यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने चिनी बनावटीची क्षेपणास्त्रे पाडली. हा केवळ लष्करी विजय नव्हता, तर तांत्रिक आणि माहिती युद्धाचा विजय होता, असेही सूर्या यांनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा - शिष्टाचार विसरू नका! पावसाळी अधिवेशनादरम्यान सभापतींचा खासदारांना इशारा

तथापी, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानने आयएमएफकडून कर्ज घेणे ही नवीन गोष्ट नाही. 2008 आणि 2013 मध्येही त्यांनी 15 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज घेतले होते. मात्र, यावेळी त्यांना कमी रक्कम मिळाली आहे. याशिवाय, चीनबाबत बोलताना जयशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. यूपीएच्या कारकिर्दीत चीनला धोरणात्मक भागीदार मानण्यात आले होते. तेव्हा चीनबाबतची काँग्रेसची भूमिका आणि आज विरोधात असताना घेतलेली भूमिका यात फरक स्पष्ट आहे, असेही यावेळी जयशंकर यांनी ठामपणे नमूद केले. या चर्चेमुळे संसदेत एकाच वेळी सुरक्षा, माहिती युद्ध आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रीत झाले. 
 


सम्बन्धित सामग्री