Pakistan fired 413 drones प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याबाबत, बीएसएफ राजस्थान फ्रंटियरचे महानिरीक्षक (आयजी) एमएल गर्ग यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
पाकिस्तानने 413 हून अधिक ड्रोन डागले -
बीएसएफचे महानिरीक्षक एमएल गर्ग यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सीमेवरून अनेक ठिकाणी लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु प्रत्येक कट उधळून लावण्यात आला. पाकिस्तानने राजस्थानमधील जैसलमेर, गंगानगर, बारमेरला लागून असलेल्या अनेक ठिकाणी 413 हून अधिक ड्रोन डागले होते, जे हवेतच नष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे, अनेक क्षेपणास्त्रे देखील डागण्यात आली, जी हवेतच निष्क्रिय करण्यात आली.
हेही वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पाकिस्तानकडून चिनी क्षेपणास्त्रांचा वापर -
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता युद्धबंदी आहे, परंतु राजस्थानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही अंतरावर पाकिस्तानी सैन्य रेंजर्ससह तैनात आहे. त्यांनी असेही सांगितले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवरील सर्व गावे रिकामी केली होती, परंतु बीएसएफने गावकऱ्यांना रिकामे करण्यास सांगितले नाही तर त्यांना सतर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, पाकिस्तानकडून चिनी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता, असंही एमएल गर्ग यांनी सांगितलं.
हेही वाचा - गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणीत पोलखोल; दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये चॅटिंग
पाकिस्ताचे सर्व डाव उधळले -
दरम्यान, बीएसएफचे आयजी एमएल गर्ग यांनी सांगितले की, बीएसएफने भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या कारवाया हाणून पाडल्या आहेत. आमच्याकडे क्षेपणास्त्रांच्या संख्येचा डेटा नाही, परंतु राजस्थान सीमेवरील जैसलमेरपासून गंगानगर, बारमेरपर्यंत 413 हून अधिक ड्रोन डागण्यात आले. आम्ही ते सर्व ड्रोन हवेत नष्ट केले.