Sunday, August 31, 2025 07:09:30 PM

पंतप्रधान मोदींनी जारी केले 1000 रुपयांचे नाणे; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

नाण्याच्या मागील बाजूस घोड्यावर स्वार असलेला सम्राट राजेंद्र चोल यांची आकर्षक कोर केलेली प्रतिमा आहे, तर पार्श्वभूमीत प्राचीन नौदल जहाज दाखवण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी जारी केले 1000 रुपयांचे नाणे काय आहेत त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या
PM Modi released a 1000 rupee coin
Edited Image

तामिळनाडू: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना गंगाईकोंडाचोलापुरम येथे एका ऐतिहासिक प्रसंगानिमित्त 1000 रुपयांचे विशेष नाणे जारी केले. हे नाणे प्रसिद्ध चोल सम्राट राजा राजेंद्र चोल-1 यांच्या नौदल मोहिमेच्या 1000 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात वाहतूक मंत्री एस.एस. शिवशंकर, तामिळनाडूचे अर्थमंत्री थंगम थेनारासु, तसेच व्हीसीके पक्षाचे नेते थोल थिरुमावलवन हे देखील उपस्थित होते.

नाण्याचं डिझाइन आणि वैशिष्ट्ये

या खास नाण्याचे डिझायनिंग गंगाईकोंडाचोलापुरम विकास परिषद ट्रस्टचे अध्यक्ष आर. कोमागन यांनी केले आहे. त्यांनी हे डिझाईन केंद्र सरकारकडे सादर केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने प्रस्ताव स्वीकारत हे नाणे अधिकृतपणे जारी केले. नाण्याच्या मागील बाजूस घोड्यावर स्वार असलेला सम्राट राजेंद्र चोल यांची आकर्षक कोर केलेली प्रतिमा आहे, तर पार्श्वभूमीत प्राचीन नौदल जहाज दाखवण्यात आले आहे. या प्रतीकांतून चोल साम्राज्याच्या भव्यतेची आणि त्याच्या सागरी सामर्थ्याची झलक स्पष्टपणे दिसते.

हेही वाचा - महामार्गावर अचानक ब्रेक लावणे निष्काळजीपणा मानला जाईल! रस्ते अपघातांवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

यापूर्वीही 1000 रुपयांचे नाणे झाले होते जारी - 

तथापी, यापूर्वी देखील 1000 रुपयांचे नाणे जारी झाले आहे. 2010 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने तंजावरमधील बृहदीश्वर मंदिराच्या 1000 व्या वर्धापन दिनानिमित्त असेच एक नाणे जारी केले होते. त्या वेळीही ते नाणे केवळ ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सादर करण्यात आले होते.

हे नाणे सर्वसामान्यांसाठी नाही - 

हे 1000 रुपयांचे नाणे स्मारक नाणे म्हणून जारी करण्यात आले आहे, त्यामुळे ते दैनंदिन व्यवहारासाठी वापरता येत नाही. स्मारक नाणी मुख्यतः संग्रहासाठी म्हणून जारी केली जातात. कायदेशीर चलन म्हणून त्यांचा व्यवहार बाजारात होत नाही. तथापि, या नाण्यांना बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रचंड मागणी असते. काही वेळा ही नाणी त्यांच्या मूळ किमतीपेक्षा काही पट अधिक दराने विकली जातात.

हेही वाचा - दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात; 1 ऑगस्टपासून लागू होणार नवीन किमती

ऐतिहासिक महत्त्व

राजेंद्र चोल-1 हे दक्षिण भारतातील एक महान सम्राट होते, ज्यांनी चोल साम्राज्याचा विस्तार समुद्रमार्गे आग्नेय आशियापर्यंत केला होता. त्यांच्या नौदल मोहिमांचा इतिहास हा भारताच्या सागरी सामर्थ्याचा गौरवशाली भाग आहे. अशा पार्श्वभूमीवर हे नाणे केवळ धातूचा तुकडा नसून, भारतीय इतिहासाचा एक मौल्यवान स्मृतीचिन्ह आहे. संग्रहकर्त्यांसाठी हे नाणे निश्चितच एक अभिमानास्पद वस्तू ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री