Monday, September 01, 2025 11:02:49 AM

शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींची मराठीत खास पोस्ट, छत्रपती शिवरायांना भावपूर्ण अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून खास पोस्ट करत महाराजांना अभिवादन केले आहे. त्यांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टी नेतृत्वाची आठवण काढत मोदींनी महाराजांना वंदन केले.


शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींची मराठीत खास पोस्ट छत्रपती शिवरायांना भावपूर्ण अभिवादन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून खास पोस्ट करत महाराजांना अभिवादन केले आहे. त्यांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टी नेतृत्वाची आठवण काढत मोदींनी महाराजांना वंदन केले.

पंतप्रधान मोदींनी शिवरायांना केलेले नमन अभिवादन 
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदृष्टीने त्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली. त्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देतात.” यासोबतच मोदींनी एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये शिवरायांच्या योगदानाची आठवण करून दिली आहे.

हेही वाचा : chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 : जाणून घ्या: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवहार

''शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत''- मोदी 
पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, ते केवळ राजा, महाराजा किंवा राजपुरुष नाहीत, तर आमच्यासाठी ते आराध्य दैवत आहेत. आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही.”

ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, त्यांची विचारधारा आणि न्यायप्रियता अनेकांना प्रेरित करते. त्यांची धाडसी कार्यशैली, सैनिकी कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय धोरणे आजही प्रेरणादायी आहेत.”

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

“शिवरायांचे स्वप्न साकार करायचे”

मोदींनी शिवरायांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त करत म्हटले, “जगभरातील अनेक देशांमध्ये आजही शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अभ्यास केला जातो. त्यांनी स्थापित केलेल्या मूल्यांवरच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. आत्मनिर्भर आणि सुशासन असलेला भारत घडवणे, हेच त्यांचे स्वप्न होते आणि ते साकार करण्याचा आपला प्रयत्न आहे.”

हेही वाचा : chhatrapati shivaji maharaj jayanti 2025: सोहळा शिवजन्मोत्सवाचा; शिवनेरीवर उत्साह
 

शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साह

शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ठिकठिकाणी मिरवणुका, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या या पोस्टमुळे शिवप्रेमी अधिक उत्साहित झाले असून, सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री