Ashwini Vaishnaw Father Dies
Edited Image
नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील दौलाल वैष्णव यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर जोधपूर एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती जोधपूर एम्सनेच दिली आहे. रुग्णालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे आज सकाळी 11.52 वाजता निधन झाले. एम्स जोधपूरने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जोधपूर एम्सकडून दौलाल वैष्णव यांच्या मृत्यूची पुष्टी -
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वडील जोधपूर एम्समध्ये उपचार घेत होते. त्यांच्या निधनाची माहिती रुग्णालयानेच दिली आहे. दौलाल वैष्णव यांच्या निधनाची माहिती आज सकाळी 11:52 वाजता जोधपूर एम्सने दिली. जोधपूर एम्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रेल्वेमंत्र्यांचे वडील दौलाल वैष्णव यांचे आज 8 जुलै 2025 २रोजी सकाळी 11:52 वाजता एम्स जोधपूर येथे निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखद आहे. तथापी, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना जोधपूर एम्सच्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, 'ते गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होते आणि एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. वैद्यकीय पथकाच्या सर्व शक्य प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. एम्स जोधपूर कुटुंब दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करते आणि शोकसंतप्त कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करते.'
हेही वाचा - Asia Longest Hyperloop Tube: IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली आशियातील सर्वात लांब हायपरलूप ट्यूब; पहा व्हिडिओ
हेही वाचा - कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा; कर्जतकरांची केंद्रिय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
दौलाल वैष्णव कोण होते?
दौलाल वैष्णव हे राजस्थानातील पाली जिल्ह्यातील जीवनद कला येथील रहिवासी होते. नंतर ते त्यांच्या कुटुंबासह जोधपूरमध्ये स्थायिक झाले. दौलाल वैष्णव हे एक अनुभवी वकील आणि आयकर सल्लागार होते, ज्यांनी अनेक वर्षे जोधपूरमध्ये प्रॅक्टिस केली. त्यांचा मुख्य व्यवसाय कायदेशीर सेवा आणि कर सल्लामसलत प्रदान करणे हा होता. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीव्यतिरिक्त, त्यांनी त्यांच्या मूळ गावी जीवनद कला येथे सरपंचपदही भूषवले.