Sunday, August 31, 2025 07:54:33 AM

गेल्या 20 दिवसांत राम मंदिराला मिळाली 'इतकी' देणगी! मोजणही झालं कठीण

प्रयागराज येथील महाकुंभामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली आहे. लोक मंदिराला देणगी देत आहेत. त्यामुळे देणग्यांची मोजणी करणेही कठीण झाले आहे.

गेल्या 20 दिवसांत राम मंदिराला मिळाली इतकी देणगी मोजणही झालं कठीण
Ayodhya Ram Mandir
Edited Image

Ayodhya Ram Mandir Donation: अयोध्येत राम मंदिर बांधल्यापासून देशभरातून भाविक रामलल्लांच्या दर्शनासाठी येत आहेत. गेल्या एका वर्षात राम मंदिराला 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. सध्या प्रयागराज येथील महाकुंभामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली आहे. लोक मंदिराला देणगी देत आहेत. त्यामुळे देणग्यांची मोजणी करणेही कठीण झाले आहे. लोक दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे आहेत आणि मंदिराच्या बांधकामात योगदान देण्यासाठी उदारमनाने भरघोस देणगी देत ​​आहेत.

राम मंदिरातील गेल्या 20 दिवसांतील दान मोजणं झालं कठीण - 

मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 20 दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत की त्या मोजताही येणं कठीण झालं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या बांधकामासाठी दररोज कोट्यवधी रुपयांचे देणगी येत आहे. इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, गेल्या 20 दिवसांत भाविकांनी इतके दान केले आहे की, ते मोजणेही कठीण झाले आहे. दररोज लाखो भाविक अयोध्येत पोहोचत आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दान करत आहे.

हेही वाचा - भारतातील 'या' टॉप 5 सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर्स तुम्हाला माहित आहेत का? त्यांची एकूण संपत्ती ऐकून व्हाल अवाक!

ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून लोक त्यांच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार देणगी देत ​​आहेत. गेल्या एका वर्षात, मंदिराला 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची देणगी मिळाले आहे. तथापि, इतर मंदिरांना किती देणगी मिळाली आहे याची माहिती ट्रस्टकडे नाही. पण अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी पाहून हे स्पष्ट होते की, लोकांची रामलल्लावरील श्रद्धा आणि प्रेम अनंत आहे. 

अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी - 

दरम्यान, दररोज लाखो भाविक राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. महाकुंभामुळे ही संख्या आणखी वाढली आहे. मंदिराभोवती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. लोक दर्शनासाठी तासन्तास वाट पाहत आहेत. तथापी, देणगी देण्यासाठी लांब रांगा लागत आहेत, परंतु अनेक भाविक दानपेटीपर्यंत पोहोचू शकत नसल्याने ते मंदिराच्या आवारात पैसे सोडून निघून जातात, असंही सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा - World's Most Expensive Cow: 40 कोटी रुपयांना विकली गेली 'ही' गाय! ठरली जगातील सर्वात महागडी गाय; काय आहे खास? वाचा

गेल्या वर्षी राममंदिराला 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त दान - 

अयोध्येतील राम मंदिरासाठी गेल्या एका वर्षात 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त दान देण्यात आले आहे. सध्या महाकुंभामुळे भाविकांची संख्या सतत वाढत आहे. लोक देशभरातून रामलल्लांच्या दर्शनासाठी येत असून मोठ्या मनाने मंदिरासाठी देणगी देत आहेत. राम मंदिराच्या बांधकामाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री