Delhi CM Residence Sheesh Mahal
Edited Image
Delhi CM Residence Sheesh Mahal: भाजप आमदार रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 'शीश महाल' निवासस्थानी राहण्यास नकार दिला असून त्या या निवासस्थानाचे संग्रहालयात रूपांतरित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या कारकिर्दीत मोठ्या खर्चाने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले. सार्वजनिक पैशातून केलेल्या कथित खर्चामुळे हा बंगला एका हाय-प्रोफाइल राजकीय घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रामलीला मैदानावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. दिल्लीत भाजप 26 वर्षांनी पुन्हा सत्तेत आले आहे. बुधवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 50 वर्षीय गुप्ता यांची नवनिर्मित 8 व्या दिल्ली विधानसभेत एकमताने सभागृह नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी बुधवारी संध्याकाळी राज निवास येथे औपचारिकपणे आपला दावा सादर केल्यानंतर त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले.
हेही वाचा - New Delhi Chief Minister Rekha Gupta : काय आहे रेखा गुप्ता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी? जाणून घेऊ..
रेखा गुप्ता या दिल्लीच्या 9 व्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. नवीन मंत्रिमंडळाची घोषणा करणाऱ्या सरकारी अधिसूचनेनुसार, गुप्ता यांच्यासोबत, त्यांच्या परिषदेत नवनिर्वाचित सहा भाजप आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील.
खालील आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ -
परवेश वर्मा
आशिष सूद
पंकज सिंग
मनजिंदर सिंग सिरसा
कपिल मिश्रा
रविंदर इंद्रराज
हेही वाचा - Delhi New CM: सस्पेंस संपला! दिल्लीची कमान रेखा गुप्ता यांच्या हातात; दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
दरम्यान, दिल्लीत नवीन मंत्रिमंडळाची पहिली अधिकृत बैठक दुपारी 3 वाजता दिल्ली सचिवालयात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महिला समृद्धी योजनाअंतर्गत पात्र महिलांना मासिक 2500 रुपये अनुदानाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाने 'आप'च्या दहा वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. भाजपने 48 जागा जिंकून सरकार स्थापन करण्यासाठी निर्णायक बहुमत मिळाले.