India Richest Muslim Businessman
Edited Image
India Richest Muslim Businessman: आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपतीबद्दल सांगणार आहोत. भारतातील या मुस्लिम कुटुंबाचा व्यवसाय गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. आपण प्रेमजी कुटुंबाबद्दल बोलत आहोत. प्रेमजी कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव अझीम प्रेमजी आहे. अझीम प्रेमजी हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. जे विप्रो या आयटी कंपनीचा मालक आहे. अझीम प्रेमजी यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
मोहम्मद अली जिनांनी मोहम्मद प्रेमजींना दिली होती 'ही' ऑफर -
अझीम प्रेमजींचा जन्म 1945 मध्ये मुंबईत झाला. अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद प्रेमजी होते, जे तांदळाचे व्यापारी होते. ते म्यानमारमध्ये त्यांचा व्यवसाय करायचे. 1940 मध्ये, मोहम्मद प्रेमजी भारतात आले आणि येथेच स्थायिक झाले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी, मोहम्मद अली जिना यांनी मोहम्मद प्रेमजींना पाकिस्तानात येण्यास सांगितले आणि त्यांना अर्थमंत्रीपदाची ऑफरही दिली. परंतु, मोहम्मद प्रेमजींनी ही ऑफर नाकारली आणि ते भारतातच राहिले.
हेही वाचा - अदानी समूहाच्या कंपन्या भरत आहेत 'मोदी सरकार'ची तिजोरी! गेल्या वर्षी भरला 58,104 कोटी रुपयांचा टॅक्स
वडिलांच्या निधनानंतर अझीम प्रेमजींनी सांभाळला कुटुंबाचा व्यवसाय -
दरम्यान, अझीम प्रेमजी यांनी भारतात शिक्षण घेतले. त्यानंत ते अमेरिकेला गेले. मोहम्मद प्रेमजी यांच्या निधनानंतर अझीम प्रेमजी यांना कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी घ्यावी लागली. अझीम प्रेमजींनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हाती घेतला आणि हळूहळू कंपनीला यशाकडे नेले. हळूहळू, हा व्यवसाय आणखी वाढला आणि त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात पाऊल ठेवले.
हेही वाचा - भारतातील १ रुपया 'या' देशात आहेत तब्बल २९६ रुपये. जाणून घ्या
भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती -
अझीम प्रेमजी यांनी 1980 मध्ये आयटी क्षेत्रात प्रवेश केला आणि विप्रोची सुरुवात केली. आज विप्रोचा व्यवसाय 3 ट्रिलियनपर्यंत पोहोचला आहे. अझीम प्रेमजी यांचे कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 12.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांनी 9713 कोटी रुपये दान केले. या हिशोबाने एका दिवसाचे दान केलेले रुपये सरासरी 27 कोटी रुपये होतात.