Sunday, August 31, 2025 08:05:16 PM

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतून 455 कोटी रुपये गायब; मल्लिकार्जुन खरगे यांचा खळबळजनक दावा

सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतून 455 कोटी रुपये गायब झाले असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. खरगे यांच्या दाव्यावर मोदी सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

 बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतून 455 कोटी रुपये गायब मल्लिकार्जुन खरगे यांचा खळबळजनक दावा
Mallikarjun Kharge On Beti Bachao Beti Padhao Scheme
Edited Image

Mallikarjun Kharge On Beti Bachao Beti Padhao Scheme: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) योजनेसंदर्भात मोठा दावा केला आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की, सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतून 455 कोटी रुपये गायब झाले असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. खरगे यांच्या दाव्यावर मोदी सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मल्लिकार्जुन खरगे आपल्या एक्स अकाउंटवरून यासंदर्भात पोस्ट करत भाजप सरकारवर निशाना साधला आहे.  

मल्लिकार्जुन खरगे यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माहिती अधिकार कायद्यानुसार मोदी सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतून 455 कोटी रुपये गायब झाल्याचे उघड झाले आहे. 'महिलांवर आता पुरे झाले हल्ले' या भाजपच्या जाहिरातीचा प्रतिध्वनी गेल्या 10 वर्षांपासून भाजप राजवटीत आणि कधीकधी भाजपच्या गुंडांकडून छळ सहन करणाऱ्या सर्व महिलांच्या आक्रोशांची थट्टा करत आहे.

हेही वाचा - काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भाजपने 'बेटी बचाओ' ऐवजी 'गुन्हेगारांना वाचवा का स्वीकारले?  

मल्लिकार्जुन खरगे यांनी दावा केला की, पुण्यात सरकारी बसमध्ये एका महिलेवर अलिकडेच झालेला बलात्कार असो, किंवा मणिपूर आणि हाथरसमधील आपल्या मुली असोत किंवा महिला ऑलिंपिक चॅम्पियन असोत, भाजपच्या राजवटीत महिलांच्या सुरक्षेचा कोणताही मागमूस शिल्लक नाही. आम्ही अलीकडेच मोदीजींना “बेटी बचाओ” वर तीन प्रश्न विचारले होते, त्यापैकी एक आकडेवारी लपवण्यावर होता. आज, नवीनतम आरटीआय खुलाशांसह, मोदी सरकारचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. भाजपने "बेटी बचाओ" ऐवजी "गुन्हेगारांना वाचवा" हे धोरण का स्वीकारले? मणिपूरच्या महिलांना न्याय कधी मिळेल? असा संतप्त सवाल खरगे यांनी केला आहे.  

हेही वाचा - सैनिकी शाळांचे खासगीकरण रोखा ;खर्गे यांचे राष्ट्रपतींना पत्र

देशात दर तासाला महिलांवरील अत्याचाराचे 43 गुन्हे का नोंदवले जातात? आपल्या देशातील सर्वात असुरक्षित दलित-आदिवासी वर्गातील महिला आणि मुलांविरुद्ध दररोज 22 गुन्हे नोंदवले जातात. मोदीजींनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये महिलांच्या सुरक्षेबद्दल अनेकदा बोलले आहे, पण त्यांच्या उक्ती आणि कृतीत एवढा फरक का आहे? 2019 पर्यंत, "बेटी बचाओ, बेटी पढाओ" योजनेसाठी वाटप केलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 80% रक्कम केवळ मीडिया जाहिरातींवर खर्च करण्याचे कारण काय? असा प्रश्न देखील खर्गे यांनी उपस्थित केला आहे. 

प्रत्येक ट्रकच्या मागे 'बेटी बचाओ' जाहिरात चिकटवून महिलांवरील गुन्हे थांबतील का?   

मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांत महिला आणि बालविकास मंत्रालयावर खर्च केलेले बजेट एकूण बजेटच्या निम्मे का केले आहे? प्रत्येक ट्रकच्या मागे "बेटी बचाओ" चिकटवून किंवा प्रत्येक भिंतीवर ते रंगवून महिलांवरील गुन्हे थांबतील का? त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का? त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील का? किंवा अत्याचारानंतर महिलांना न्याय मिळेल का?  'महिलांवरचे हल्ले आता पुरे झाले', ही भाजपची पोकळ जाहिरात 10 वर्षांनंतर त्यांचा ढोंगीपणा दाखवते, असंही मल्लिकार्जून खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री