Monday, September 01, 2025 11:09:35 AM

Shibu Soren Death: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

shibu soren death झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शिबू सोरेन किडनीच्या संबंधित आजारामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन शिबू सोरेन यांच्या निधनावेळी दिल्लीतील रुग्णालयात उपस्थित होते.हेमंत सोरेन हे शिबू सोरेन यांचे पुत्र आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक्स पोस्ट करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. 'आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. 'आज मी शून्य झालो आहे...' असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. वडिलांच्या निधनामुळे मुख्यमंत्री दु:खी झाले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पाठीवरचे पित्याचे छत्र हरपले आहे. 

 

मागील काही दिवसांपासून शिबू सोरेन आजारी होते. त्यामुळे जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. ते व्हेंटिलेटरवर होते. 

शिबू सोरेन झारखंडमध्ये 'गुरुजी' नावाने ओळखले जात होते. ते झारखंड मुक्ति मोर्चाच्या संस्थापकीय नेत्यांपैकी एक होते. आदिवासी लोकांच्या हक्कांच्या लढाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी वेगळ्या झारखंड राज्याच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि तीनदा राज्याचे मुख्यमंत्रीही बनले.


सम्बन्धित सामग्री