Thursday, August 21, 2025 02:27:04 AM

Sourav Ganguly Car Accident: सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेसवेवर अपघात; थोडक्यात बचावला माजी कर्णधार

गांगुलीच्या गाडीचा वेग इतका जास्त नव्हता आणि चालकाच्या तत्पर कारवाईमुळे या घटनेत मोठी दुर्घटना टळली. गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले.

sourav ganguly car accident सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेसवेवर अपघात थोडक्यात बचावला माजी कर्णधार
Sourav Ganguly
Twitter

Sourav Ganguly Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारचा गुरुवारी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्सप्रेसवेवर अपघात झाला. या अपघातातून तो थोडक्यात बचावला. एका कार्यक्रमासाठी बर्दवानला जात असताना दुर्गापूर एक्सप्रेस वेवरील दंतनपूर येथे ही घटना घडली. गांगुली त्यांच्या रेंज रोव्हरमध्ये बसले होते तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला. एक्सप्रेसवेवर अचानक एका लॉरीने गांगुलीच्या ताफ्याला ओव्हरटेक केले, ज्यामुळे चालकाला ब्रेक लावावा लागला. यामुळे गांगुलीच्या गाडीमागील वाहने एकमेकांवर आदळली.

हेही वाचा - IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी ‘श्रीगणेशा’, गिलचे शतक, शमीचा पंजा, बांगलादेशचा उडवला धुव्वा

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. असं सांगण्यात येत आहे की, गांगुलीच्या गाडीचा वेग इतका जास्त नव्हता आणि चालकाच्या तत्पर कारवाईमुळे या घटनेत मोठी दुर्घटना टळली. गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले तर माजी क्रिकेटपटूला त्याच्या नियोजित कार्यक्रमासाठी बर्दवानला जाण्यापूर्वी सुमारे 10 मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली.

गांगुलीला बर्दवान विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. या कार्यक्रमात माजी कर्णधार सौरभ गांगुलीने विद्यार्थी आणि मान्यवरांशी संवाद साधला जिथे त्याने भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या प्रसिद्ध कारकिर्दीतील किस्सेही सांगितले. अलिकडेच, गांगुली महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत दिसला.  

हेही वाचा - Ind vs Ban : शमी-राणाचा भेदक मारा, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले २२९ धावांचे लक्ष्य

क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या मागील अनुभवाव्यतिरिक्त, बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) चे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचे स्थान स्वीकारले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, त्यांना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्समध्ये क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मधील दिल्ली कॅपिटल्स महिला संघासह सर्व क्रिकेट उपक्रमांचे निरीक्षण केले आहे. 


सम्बन्धित सामग्री