किश्तवाड (J&K News) : पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. किश्तवाडमध्ये लष्करी गणवेश आणि लढाऊ नमुन्याच्या कपड्यांची विक्री, शिवणकाम आणि साठवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशविरोधी घटकांकडून याचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जर, कोणी असे करताना आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. दरम्यान, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, किश्तवाडमध्ये लष्करी गणवेश आणि लढाऊ नमुन्याच्या कपड्यांची विक्री, शिवणकाम आणि साठवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशविरोधी घटकांकडून त्याचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - '..तर भारतातला पंजाब पाकिस्तानसोबत असेल', पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तान फुटीरतावाद्याचा व्हिडिओ
किश्तवाडचे उपायुक्त राजेश कुमार शवन यांनी गणवेश विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नियम आणि निर्बंध जारी केले आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की लष्करी गणवेश खरेदी करणे आणि शिवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. जर असे कुठेही घडले तर जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 26 पर्यटकांची हत्या केली. तेव्हापासून, सुरक्षा दलांकडून खोऱ्यात शोध मोहीम सुरू आहे. किश्तवाडमधील जिल्हा प्रशासनाने लष्कराच्या गणवेशाची विक्री, शिवणकाम आणि साठवणूक करण्यावर बंदी घातली आहे.
दुसरीकडे, सुरक्षा दलांनी गेल्या तीन दिवसांत काश्मीर खोऱ्यात 10 दहशतवाद्यांची घरे उडवून दिली आहेत. भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
याशिवाय, गेल्या दोन दिवसांत 272 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. 13 राजनयिक अधिकाऱ्यांसह 629 भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत.
दरम्यान, नौदलाने अरबी समुद्रात अनेक जहाजविरोधी गोळीबार कवायती केल्या. विशेष म्हणजे या काळात डागण्यात आलेले क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक मारा करू शकतात. देशाच्या सागरी सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
हेही वाचा - दहशतवाद पोसणाऱ्या पाकड्यांच्या आर्थिक नाड्या भारत आवळणार; सिंधू जलकरार स्थगितीनंतर 'हे' दोन हल्ले?