Thursday, August 21, 2025 12:09:01 AM

शाळेत घृणास्पद प्रकार; पिरीयडस आल्यामुळे परीक्षेवेळी विद्यार्थिनीला दिली अशी वागणूक

वर्गाबाहेर बसून वार्षिक परीक्षा देणाऱ्या किशोरवयीन विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आला. यात तिच्या आईने केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरू झाली.

शाळेत घृणास्पद प्रकार पिरीयडस आल्यामुळे परीक्षेवेळी विद्यार्थिनीला दिली अशी वागणूक

कोयम्बतूर : महिला आणि मुलींना येणाऱ्या मासिक पाळीविषयी संस्कृती आणि धार्मिकतेच्या नावाखाली माजवले जात असलेले अवडंबर काही नवीन नाही. याविषयी अजूनही उघडपणे फार बोलले जात नाही. यामुळे संस्कृतीच्या कथित रक्षकांचे चांगलेच फावते. अति रूढीवाद्याचे तर काही विचारायलाच नको..

नुकताच, शाळेत शिकणाऱ्या एका मुलीला याबदद्लचा कटू अनुभव आला. शालेय परीक्षेदरम्यान मासिक माळी आल्यामुळे तिला वर्गाबाहेर पायऱ्यांवर बसून पेपर लिहिण्यास भाग पाडण्यात आले. तमीळनाडूमधील कोयम्बतूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. आठवीच्या विद्यार्थिनीचा शाळेच्या पायऱ्यांवर बसून पेपर लिहित असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ या मुलीच्या आईने शूट केला होता. यानंतर चौकशी सुरू झाली असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे.

काय प्रकार घडला?
ही मुलगी पोल्लाची जवळील सेनगुट्टैपलयम येथील मॅट्रिक्युलेशन शाळेची विद्यार्थिनी आहे. या आठवड्यात दोन परीक्षा होणार असल्याने, तिच्या पालकांनीच तिच्या सोयीसाठी वर्गात स्वतंत्र डेस्कची विनंती केली, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, सोमवारी तिला परीक्षा लिहिण्यासाठी वर्गाबाहेर पायऱ्यांवर बसण्यास सांगण्यात आले. बुधवारी तिचे पालक शाळेत आले, तेव्हा त्यांना पुन्हा ती पायऱ्यांवर परीक्षा लिहिताना आढळली. आईने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये, विद्यार्थिनी मुख्याध्यापकांनी तिला बाहेर बसण्याची सूचना दिल्याचे म्हणत असल्याचे ऐकू येते.

मॅट्रिक्युलेशन स्कूलचे संचालक ए. पलानीसामी म्हणाले, “मुख्य शिक्षण अधिकारी चौकशी करत आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. खासगी शाळांच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देखील मागितले आहे.”

मुलीला पिरीयडस सुरू असलेले शाळेत कसे समजले?
गुरुवारी प्राथमिक चौकशी करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सृष्टी सिंह यांनी पत्रकारांना सांगितले: “विद्यार्थिनीच्या आईने 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास वर्गशिक्षिकेला फोन केला आणि विशेष बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. वर्गशिक्षिकेने आईला मुख्याध्यापकांशी बोलण्यास सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक! विमानतळावर विमान सुखरूप उतरवलं...; पण थोड्याच वेळात वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू

पालकांनीच केली होती स्वतंत्र बैठक व्यवस्थेची मागणी
“7 एप्रिल रोजी, सोमवारी, तिच्या मुलीला सोडताना, आई मुख्याध्यापकांना भेटली आणि संसर्ग टाळण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची विनंती केली. ती गेल्यानंतर, विद्यार्थिनीला परीक्षा लिहिण्यासाठी वर्गाबाहेर बसवण्यात आले. त्या संध्याकाळी, ती घरी परतली आणि जमिनीवर बसल्यामुळे पाय दुखत असल्याची तक्रार केली. ती दुसऱ्या दिवशी रिव्हिजन क्लासला उपस्थित राहिली नाही आणि बुधवारी दुसरी परीक्षा लिहिण्यासाठी परतली. एका नातेवाईकाने कंपाऊंडच्या भिंतीवरून तिला वर्गाच्या बाहेर बसलेले पाहिले आणि पालकांना कळवले. आईने शाळेत धाव घेतली आणि घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.”
सृष्टी सिंग पुढे म्हणाल्या की, अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही आणि ती मिळाल्यानंतर निष्पक्ष चौकशी केली जाईल.

मुख्याध्यापकांचे निलंबन
दरम्यान, शाळेने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा, 2009 च्या कलम 17 अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत, जे मुलांचा शारीरिक किंवा मानसिक छळ करण्यास प्रतिबंधित करते.

मुलीच्या वडिलांनी गुरुवारी नेगमम पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे शाळेच्या मुख्याध्यापक एम. आनंदी, कार्यालयीन सहाय्यक शांती आणि प्रतिनिधी थांगवेलपांडियन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जातीच्या आधारेही पालकांकडून तक्रार
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 च्या कलम 3(1) (r) आणि 3(1) (za) (d) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. [ही मुलगी अनुसूचित जातीची आहे].
पालकांच्या याचिकेत असाही आरोप आहे की, मुलीच्या आईने गैरवर्तनावर प्रश्न उपस्थित केला तेव्हा तिन्ही आरोपींनी जातीच्या आधारावर तिचा अपमान केला.

पालकांनीच केली होती स्वतंत्र बैठक व्यवस्थेची मागणी
या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या पालकांनी तिच्यासाठी विशेष व्यवस्थेची मागणी केली, ही बाब अत्यंत खेदाची आणि आश्चर्याचीही दिसत आहे. कारण, पालकांकडून झालेल्या मागणीनंतरच या विद्यार्थिनीला सर्वांसोबत बसून परीक्षा न देता स्वतंत्र बसून पेपर लिहावा लागला. यामुळे या विद्यार्थिनीला विनाकारण शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे या प्रकरणी पालकांचीही मानसिकता समोर येत असून त्यांची चौकशी होणे आवश्यक ठरत आहे.

हेही वाचा - Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?


सम्बन्धित सामग्री